Full Width(True/False)

कोट्यवधी इनअॅक्टिव युजर्स, तरीही रिलायन्स जिओ 'नंबर वन'

नवी दिल्लीः रिलायंस जिओ () ने पुन्हा एकदा दुसऱ्या टेलिकॉम कंपन्यांना मागे टाकले आहे. जिओ देशातील पहिली अशी टेलिकॉम कंपनी बनली आहे. या कंपनीकडे ४० कोटी सब्सक्रायबर्स आहेत. जुलै मध्ये कंपनीने ३५.५ लाख नवीन युजर्स आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत. कंपनीच्या अॅक्टिव युजर्समध्ये ८.५ कोटींहून अधिक कमी आहे. या दरम्यान जुलै मध्ये टेलिकॉम इंडस्ट्रीला ३५ लाख युजर्संचा फायदा झाला आहे. ऑफलाईन चॅनेल्स उघडल्यानंतर आणि इकॉनॉमी वेग पकडण्यासाठी देशात सब्सक्रायबर्सची संख्या वाढून ११४.४ कोटी झाली आहे. वाचाः वेगाने कमी होताहेत अॅक्टिव युजर्स जून २०२० मध्ये भारती टेलिकॉम सब्सक्रायबर्स मध्ये ३२ लाखची कमी आली होती. ट्रायच्या लेटेस्ट डेटाच्या माहितीनुसार, रिलायन्स जिओकडे सर्वात जास्त सब्सक्रायबर्स असले तरी इनअॅक्टिव सब्सक्रायबर्स मध्ये हे एअरटेल आणि वोडाफोनच्या पुढे आहे. जिओच्या अॅक्टिव युजर्संमध्ये ८.७८ कोटीची कमी आली आहे. तर एअरटेलच्या इनअॅक्टिव युजर्संची संख्या ९५ लाख आणि वोडाफोन-आयडियाच्या इनअॅक्टिव युजर्संची संख्या ३.२१ कोटी आहे. मायग्रेंट युजर्समुळे कमी झाले युजर्स रेटिंग एजन्सी फीचचे सीनियर डायरेक्टर नितीन सोनी यांनी सांगितले की, जिओच्या इनअॅक्टिव युजर्सच्या मागे लॉकडाउन मुळे अन्य शहरातील मायग्रेंट आहेत. त्यांनी आता जिओ नंबर वापरणे बंद केले आहे. वाचाः युजर्संची संख्या जुलैच्या अखेर मध्ये जिओची एकूण संख्या ४०.०८ कोटी राहिली आहे. एअरटेलची जुलैमध्ये ३२.६ लाख वायरलेस सब्सक्रायबर्स अॅड केले आहेत. तसेच एअरटेलचे एकूण युजर्सची ३१.९९ कोटी राहिली आहे. अॅक्टिव युजर्स ९७ टक्के आहे. वाचाः वोडाफोन-आयडिया युजर्संची संख्या झाली कमी वोडाफोन-आयडिया कंपनीची अडचण वाढली आहे. कंपनीने नेहमीप्रमाणे यावेळीही मोठी संख्या गमावली आहे. जुलै मध्ये वोडाफोन-आयडियाच्या युजर्संमध्ये ३७.२ लाख कमी आली आहे. यानंतर कंपनीच्या युजर्संची संख्या कमी होऊन ३०.१३ कोटी झाली आहे. यात अॅक्टिव युजर्स ८९.३३ टक्के आहे. ट्रायच्या व्हीएलआर डेटामधून माहिती उघड अॅक्टिव युजर्सला ट्रॅक करण्यासाठी VLR (विजिटर लोकेशन रजिस्टर) चा वापर केला जातो. हे त्या युजर्सला टेंपररी रजिस्टर होतात. हे एका जागेतून दुसऱ्या जागेवर जातात. जर कोणताही सब्सक्रायबर अॅक्टिव स्टेजमध्ये असतो तर तो कॉलिंग आणि एसएमएस सर्विस युज करतो. या आधारावर अॅक्टिव युजर्स आणि इनअॅक्टिव युजर्सची ओळख पटते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/372RN8m