Full Width(True/False)

'राधे'च्या शूटिंगला सुरुवात; सेटवर घेण्यात येतेय अशी काळजी

मुंबई: सुपरस्टार याची मुख्य भूमिका असणाऱ्या '' चित्रपटाच्या चित्रिकरणाला २ ऑक्टोबरपासून कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये पुन्हा सुरुवात होणार आहे. येत्या पंधरा दिवसांच्या चित्रिकरणानंतर पॅचवर्कसाठी वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओमध्ये अंतिम चित्रीकरण पार पडेल. सरकारनं आखून दिलेले नियम, ठरवून दिलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीचं तंतोतंत पालन करण्याबरोबरच टीम कलाकार आणि क्रू मेम्बर्सच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त खबरदारीदेखील घेतली जाणार आहे. हे चित्रीकरण मुंबईबाहेरील भागात होणार असून रोजचा प्रवास टाळण्यासाठी प्रॉडक्शन टीमनं स्टुडिओजवळील हॉटेलमध्ये सर्व कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. चित्रीकरण काळात कोणत्याही सदस्याला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी असणार नाही. सलमान खान सेटवर पूर्णपणे सावधगिरी बाळगण्याबाबत आग्रही आहे. त्याच्या सल्ल्यानुसार, सेटवर एक डॉक्टर आणि एक विशेष वैद्यकीय टीम असणार आहे. याबाबत निर्माता सोहेल खान म्हणाला की, 'आम्हाला आनंद आहे की 'राधे'चं चित्रीकरण पुन्हा सुरू होत आहे. आम्ही एका एयर बबलची निर्मिती करत असून परिवहनच्या सर्व साधनांना नियमितपणे सॅनिटाइझ करण्यात येईल.' सलमान आणि दिशा पटानी यांच्याव्यतिरिक्त, प्रभूदेवाच्या दिग्दर्शनात रणदीप हुड्डा खलनायकाच्या भूमिकेत आहे. जॅकी श्रॉफ एक खास व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत, जे चित्रीकरणाच्या शेवटच्या भागात टीममध्ये सहभागी होतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ld1jtm