मुंबई: मृत्यू प्रकरणी 'एम्स'च्या अहवालावर नाराजी व्यक्त करणाऱ्या कंगना राणावतवर अभिनेत्री यांनी निशाणा साधलाय. कंगनाचं थेट नाव न घेता ट्विटरच्या माध्यमातून सोनी राजदान यांनी तिला खडे बोल सुनावले आहेत. कंगनानं केलेल्या एका ट्विटचा आधार घेत त्या म्हणाल्या, 'तरुण आणि विलक्षण माणसं एके दिवशी अचानक उठून स्वत:चं आयुष्य संपवतात...अशी विधानं करणाऱ्यांनो, हे सगळं अचानक कधीच घडत नसत हे आधी समजून घ्या. अनेक वर्ष हा मानसिक त्रास त्यांना होत असतो. वर्षानुवर्ष हा संघर्ष केल्यावर हा त्रास सहन करण्याची शक्ती ज्या दिवशी संपते त्यादिवशी दुर्दैवानं असं पाऊल उचललं जातं.' असं त्यांनी लिहिलं आहे. अभिनेत्री हिची आई आणि दिग्दर्शक यांच्या पत्नी असणाऱ्या सोनी राझदान यांनी मानसिक आरोग्याविषयी बोलणे आजच्या काळात किती गरजेचे आहे हे अधोरेखित केले. ' मानसिक आजारांचा सामना करणारा प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याला कंटाळलेला नसतो,तर या आजारांमुळे होणाऱ्या त्रासाने हताश झालेला असतो. या नैराश्यातूनच मग आत्महत्या करण्याचा विचार मनात येतो. त्यामुळे मानसिक आरोग्याविषयी बोलणे म्हणजे काहीतरी अमानवी आहे हा गैरसमज सोडून द्यायला पाहिजे. मानसिक आजारांविषयी मोकळेपणाने बोलण्याची किती गरज आहे हे आपण ओळखलं पाहिजे. मानसिक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यावर योग्य इलाज होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे इलाज करून घेण्याबाबात कोणतीही शरम बाळगता कामा नये. त्यामुळे एखाद्याचे आयुष्य वाचू शकते' असं त्या म्हणाल्या. ‘एम्स'च्या अहवालाबाबत कंगनाने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. 'तरुण आणि विलक्षण माणसं एके दिवशी अचानक उठून स्वत:चं आयुष्य संपवत नाहीत. आपल्या जीवाला धोका असल्याचं, चित्रपटसृष्टीतून आपल्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सुशांत वारंवार सांगत राहिला. मुव्ही माफिया त्याला त्रास देत असल्याचंही तो बोलला.' असं ट्विट कंगनानं केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36uAay7