Full Width(True/False)

प्रेक्षक म्हणतात हॉलिवूडचे सिनेमे पाहायचे, पण भारतीय भाषेतच

मुंबई टाइम्स टीम वैभवनं गेल्या वर्षी हॉलिवूडचा 'द लायन किंग' हा अॅनिमेटेड चित्रपट सिनेमागृहात पाहिला. त्याला तो चित्रपट तितकासा आवडला नाही. परंतु, यावर्षी हिंदीत डब झालेला तोच चित्रपट जेव्हा त्यानं टीव्हीवर पाहिला, तेव्हा मात्र त्याला तो खूप भावला. शाहरुख खान, संजय मिश्रा आणि श्रेयस तळपदे अशा बड्या कलाकारांनी त्यांच्या आवाजातून, प्रादेशिक भाषेचा तडका सिनेमाला दिला होता. वैभवप्रमाणेच भारतातील हजारो सिनेप्रेमी आपल्या मायबोलीत डब झालेले चित्रपट पाहणं पसंत करतात. याच कारणास्तव गेल्या काही वर्षांत पाश्चात्य चित्रपटनिर्मात्यांनी हिंदी आणि भारतातील इतर प्रादेशिक भाषांमध्ये त्यांच्या चित्रपटांचं डबिंग करण्याचं प्रमाण वाढवलंय. यामुळे डबिंग करणाऱ्या कलाकारांसाठी नवा मार्ग खुला झालाय. भारतीय रसिकांना आकर्षित करण्यासाठी हॉलिवूडकरांनी बॉलिवूडमधील थेट दिग्गज कलाकारांकडून डबिंग करून घेण्यास सुरुवात केली आहे. गावागावांत पोहोचतो प्रसिद्धी मिळावी आणि त्यांच्या चित्रपटांची नाळ भारतीय प्रेक्षकांशी जोडली जावी म्हणून हॉलिवूडकर त्यांच्या चित्रपटांचं डबिंग हिंदी सिनेसृष्टीतील बड्या कलाकारांकडून करून घेणं पसंत करू लागलेत. '', '' या चित्रपटांचे निर्माते याबाबत सांगतात, की 'लोक त्यांच्या भाषेत असलेले चित्रपट पाहणं पसंत करतात. चित्रपटाचं प्रादेशिक भाषेत डबिंग केल्यामुळे छोट्या-छोट्या गावातही तो चित्रपट पोहोचायला मदत मिळते. डबिंगमुळे अॅनिमेटेड चित्रपट पाहण्याचं प्रमाणदेखील वाढलंय. म्हणूनच आता डबिंग करण्याकडेही जास्त लक्ष दिलं जातंय.' दिग्गजांचा आवाजहॉलिवूडच्या '' या डब चित्रपटानं भारतात १८८ कोटी रुपये कमावले होते. तेव्हापासून भारतात बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांनी पाश्चात्य चित्रपटांचं डबिंग करण्यास सुरुवात केली. 'जंगल बुक'मधील पात्रांसाठी प्रियांका चोप्रा, इरफान खान, नाना पाटेकर आणि ओम पुरी यासारख्या बड्या कलाकारांनी आपला आवाज दिला होता. यानंतर 'सुपर हिरो कॅप्टन अमेरिका' या चित्रपटासाठी अभिनेता वरूण धवननं त्याचा आवाज दिला. तर अभिनेता रणवीर सिंगनं 'डेडपूल २' या चित्रपटासाठी डबिंग केलं. 'द पायरट्स ऑफ द कॅरेबियन' या चित्रपटाच्या मागील भागातील जॉनी डेप यांच्या जॅक स्पॅरो या पात्रासाठी अभिनेता अर्शद वारसीनं डबिंग केलं होतं. अभिनेत्री काजोलनं 'इन्क्रेडिबल्स २' या सिनेमातील इलॅस्टिगर्ल या पात्रासाठी डबिंग केलं. तसंच नेटफ्लिक्स फिल्म 'मोगली :द लिजेंड ऑफ जंगल' या चित्रपटासाठी अभिनेते अनिल कपूर, अभिषेक बच्चन, जॅकी श्रॉफ आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी डबिंग केलं. शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांनी 'द लायन किंग'साठी केलेलं डबिंग चर्चेत राहिलं. तसंच या चित्रपटातील अभिनेता संजय मिश्रा आणि श्रेयस तळपदे यांच्या आवाजाचंसुद्धा भरभरून कौतुक झालं. 'अँग्री बर्ड्स २'ला विनोदवीर कपिल शर्मा, किकू शर्मा आणि अर्चनापुरण सिंह यांनी आपल्या आवाजातून चार चांद लावले. लोकांना डबिंग करणं सोपं वाटतं. पण, ते वाटतं तेवढं सोपं नाही. डबिंग करताना आपल्याला त्या पात्रात पूर्णपणे शिरावं लागतं. त्यामुळे डबिंग आर्टिस्टपेक्षा अभिनेते हे काम काही प्रमाणात सहज निभावू शकतात. त्यामुळे हॉलिवूडवाले प्रमुख भूमिकांचं डबिंग अभिनेत्यांकडून करून घेतायत. -अर्शद वारसी, ('द पायरट्स ऑफ द कॅरिबियन'मधील जॅक स्पॅरोचा आवाज) डबिंग करणं आव्हानात्मक होतं. बॉलिवूडमध्ये अभिनय करताना स्वतःचं व्यक्तिमत्वसुद्धा आणावं लागतं. पण, हॉलिवूडमध्ये आपण फक्त पात्र बनून जातो. या पात्रांना भारतीय करणं आव्हानात्मक होतं. इंग्लिश संवाद हिंदीत डब करणं कठीण आहे. कारण दोन्ही भाषांचा लहेजा, लय वेगळी आहे. -अभिषेक बच्चन, ('मोगली :द लिजेंड ऑफ जंगल'मधील बगीराचा आवाज) संकलन - सुरज खरटमल, कॉलेज क्लब रिपोर्टर


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34nhjlJ