Full Width(True/False)

ऑस्कर विजेत्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांचं निधन

मुंबई: भारताला पहिला ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार यांचं आज निधन झालं. त्या ९१ वर्षांच्या होता. त्यांच्या निधनाचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नसून सिनेसृष्टीत शोक व्यक्त केला जात आहे. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ’ या चित्रपटासाठी भानू यांनी ऑस्कर पुरस्कार पटकावला होता. ब्रिटिशांविरुद्ध लढ्यामध्ये मोलाची भूमिका बजावणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींवर एका ब्रिटिशानं सिनेमा काढावा, हा निव्वळ योगायोग नव्हता. गांधींवर चित्रपट निर्माण करण्यासाठी रिचर्ड अॅटनबरोंनी घेतलेले परिश्रम वादातीत होते. ‘’ चित्रपटाने त्यांना जागतिक स्तरावर प्रचंड सन्मान मिळाला आणि त्यांची वेगळी ओळखही निर्माण झाली. चित्रपटात ओम पूरी, , सईद जाफ़री यांसारख्या अनेक भारतीय कलाकारांच्या देखील महत्वाच्या भूमिका होत्या. कलाकारांच्या अभिनयासोबतच आणि कलाकारांची वेशभूषेचं अर्थाच भानू यांचं प्रचंड कौतुक झालं होतं. भानू यांचा जन्म कोल्हापूरच्या अण्णासाहेब राजोपाध्ये यांच्या घरी २८ एप्रिल १९२९ रोजी झाला. चित्रकलेली आवड असलेल्या भानू यांनी ‘एकादशी महात्म्य’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर भानू यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये ‘फाईन आर्ट्स’ शाखेत प्रवेश घेतला आणि चित्रकलेचं शात्रोक्त शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी काही मासिकांमधून फॅशन इलीस्ट्रेटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. अनेक फॅशन बुटीकसाठी त्यांनी काम केलं होतं. बुटीकमध्ये काम करत असताना त्यांच्या डिझाईन अनेक कलाकारांना आवडल्यामुळं त्यांना चित्रपटासाठी कपडे डिझाईन करण्याच्या ऑफर्स मिळू लागल्या. १९५५ साली आलेल्या गुरुदत्त यांच्या ‘सीआयडी’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा डिझायनर म्हणून काम पाहिलं होतं. यानंतर भानू यांनी अनेक हिंदी चित्रपटांसाठी डिझायनर म्हणून काम पाहिलं. ‘कागज के फूल’, ‘चौदहवी का चांद’, ‘प्यासा’, ‘साहब बिबी और गुलाम’, ‘वक्त’, ‘तिसरी मंजिल’, ‘गाईड’, ‘लीडर’, ‘गंगा जमुना’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘खिलौना’सारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांसाठी त्यांनी योगदान दिलं होतं. दुसरा ऑस्कर हुकला गांधी चित्रपटासाठी ऑस्कर मिळाल्यानंतर लगान चित्रपटासाठीही त्यांना नामांकन मिळालं होतं. थोडक्यात त्यांचा हा पुरस्कार हुकला. त्यांनी आपल्या सिनेकारकिर्दीत १०० हून अधिक चित्रपटांसाठी वेषभूषाकार म्हणून काम केलं होतं. भानू यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/377OWLl