Full Width(True/False)

दिपेश सावंतची मागणी; NCB वर आरोप करत मागितले १० लाख रुपये

मुंबई- प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर आतापर्यंत २२ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड , तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा आणि कर्मचारी यांचं नाव सामिल आहे. आता जामिनावर सुटलेल्या दिपेशने नारकोटिक्स कन्ट्रोल ब्युरोविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एनसीबीने त्याला बेकायदेशीररीत्या अटक केली असा त्याचा आरोप असून त्याने १० लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. रेकॉर्डमध्ये अटकेची वेळ चुकीची दाखवली मीडिया रिपोर्टनुसार दिपेशने याचिकेत लिहिले की एनसीबीने त्याला ४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता घरातून ताब्यात घेतलं. तर ३६ तासांनंतर ६ सप्टेंबर रोजी दंडाधिकाऱ्यांसमोर उभं करण्यात आलं. याचिकेत असंही म्हटलं आहे की रेकॉर्डमध्ये ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक दाखवण्यात आली आहे. यानंतर आता दिपेशने एनसीबीकडे १० लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली असल्याचं म्हटलं जात आहे. सुशांत प्रकरणाची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही दिपेशला एनसीबीने अमली पदार्थ खरेदी आणि विक्रीच्या आरोपाखाली अटक केली होती. सुशांतची मैत्रीण रिया जवळपास एक महिना तुरुंगात राहिली. यानंतर तिला जामिनावर सोडण्यात आले. दुसरीकडे सीबीआयने अद्याप सुशांत प्रकरणातील तपास पूर्ण केलेला नाही. मात्र, एम्स पॅनेलच्या अहवालानुसार सुशांतने आत्महत्या केली हे स्पष्ट झालं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3m5dysw