नवी दिल्लीः mAadhaar Card App Launch: सध्या आधार कार्ड प्रत्येकासाठी आणि प्रत्येक कामांसाठी आवश्यक बनले आहे. सरकारी कामासाठी आधार कार्डची डिटेल्स मागितली जाते. त्यासाठी यूनिक आइडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया () ने mAadhaar अॅपचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. यामुळे आता युजर्सला घरी बसून ३५ हून जास्त सेवेचा लाभ घेता येणार आहे. वाचाः UIDAI ने mAadhaar अॅपचे नवीन व्हर्जन अँड्राइड आणि iOS या दोन्ही युजर्संसाठी उपलब्ध केले आहे. याची घोषणा UIDAI ने माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट Twitter वरून केली आहे. UIDAI ने ट्वीटद्वारे सांगितले की, युजर्संना आपल्या अॅपला अनइन्स्टॉल करण्यासोबतच नवीन लेटेस्ट व्हर्जनचे अॅप डाउनलोड करण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी यूआयडीएआयने आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉयड आणि आयओएस लिंक दिली आहे. वाचाः ही सुविधा मिळणार >> नवीन अॅप वरुन आधार कार्डची कॉपी डाउनलोड करता येईल >> नवीन अॅपमध्ये आधार अॅपला रि-प्रिंट करण्याचा ऑप्शन असेल >> अॅपमध्ये ऑफलाइन मोड मध्ये आधार पाहू शकतील. म्हणजेच अॅपमध्ये विना इंटरनेट आधार कार्डचा अॅक्सेस केला जाईल >> विना कोणत्याही डॉक्यूमेंटच्या अॅप वरून आधार मध्ये अपडेट करता येईल >> अॅपमध्ये कुटुंबातील ५ सदस्यांचा आधार ठेवता येईल. त्यांना मॅनेज करता येईल >> mAadhaar अॅपद्वारे आधार फोल्डर आपल्या यूआयईडी या आधार नंबरला कधीही लॉक किंवा अनलॉक करता येईल >> अॅपच्या मदतीने क्यूआर कोड आणि केवायसी डेटाला शेयर करता येईल >> mAadhaar वरून जवळच्या एनरॉलमेंट सेंटरची माहिती मिळू शकेल वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gicZud