Full Width(True/False)

PUBG चाहत्यांसाठी गुड न्यूज, एअरटेलसोबत पुन्हा येण्याच्या तयारीत गेम

नवी दिल्लीः चायनीज कनेक्शन आणि युजर्सचा डेटाची सिक्योरिटी संबंध असल्याने केंद्र सरकारने २०० हून अधिक अॅप्सवर भारतात बंदी घातली आहे. यात शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप टिकटॉक आणि प्रसिद्ध गेम मोबाइलचा समावेश होता. परंतु, आता समोर आले आहे की, पबजी मोबाइल भारतात पुन्हा एकदा परत येण्याची तयारी करीत आहे. यासाठी पबजीने टेलिकॉम कंपनी एअरटेलची मदत घेण्याचे ठरवले आहे. Entrackr च्या रिपोर्टमधून यासंबंधीची माहिती समोर आली आहे. वाचाः भारतात कोट्यवधी डाउनलोड करण्यात आले आहे. करोना व्हायरसमुळे लॉकडाउनमध्ये जास्त गेम खेळला गेल्याची माहिती समोर आली आहे. बंदी घातल्यानंतर पबजीला मोठ्या प्रमाणात युजरबेसचे नुकसान सोसावे लागले आहे. कंपनी एअरटेल सोबत पार्टनरशीप करू शकते. समोर आलेल्या रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पबजी मोबाइल टेलिकॉम ऑपरेटर एअरटेल सोबत यासंबंधी चर्चा करीत आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, पबजी भारतात परत येण्यासाठी प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. वाचाः रिपोर्टमध्ये म्हटले की, पबजी भारतात कँडिडेट्सच्या मुलाखती सुद्धा घेत आहेत. ४ ते ६ वर्षाच्या एक्सपिरियन्स असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेत आहे. परंतु, पबजी आणि एअरटेलकडून यावर अद्याप काहीही प्रतिक्रिया आलेली नाही. Mobile भारतात Google Play Store किंवा Apple App Store वर परत कधी येणार आहे, याविषयी सुद्धा अद्याप काही स्पष्टता नाही. वाचाः दक्षिण कोरियाची कंपनी आहे PUBG पबजी दक्षिण कोरियाची कंपनी आहे. तसेच या गेमला डेव्हलप करण्यात आले आहे. चीनची कंपनी Tencent ला याच्या मोबाइल व्हर्जनसाठी डिस्ट्रिब्यूशनची जबाबदारी दिली आहे. या गेमचे कनेक्शन चीनशी असल्याने भारतात बंदी घालण्यात आली आहे. लाँच झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांत या गेमचे १० कोटींहून अधिक वेळा डाउनलोड करण्यात आले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dfmmIU