Full Width(True/False)

200W+ चार्जिंग स्पीडचा फोन येतोय, १५ मिनिटात फुल चार्ज होणार

नवी दिल्लीः स्मार्टफोन मेकर कंपनी शाओमी १२० वॉटची फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीचा फोन घेवून येत आहे. शाओमी या वर्षी आपल्या स्मार्टफोनद्वार ही चार्जिंग घेवून आली आहे. दरम्यान कंपनी आता एवढ्यावर थांबणार नाही. तर शाओमी आता 200W+ चार्जिंग स्पीडचा फोनवर काम करीत आहे. वाचाः १५ मिनिटात फुल चार्ज होणार अँड्रॉयड सेंट्रलच्या रिपोर्टमध्ये टिप्स्टर डिजिटल चॅट सेक्शनच्या हवाल्याने हे सांगण्यात आले आहे. शाओमी 200W+ चार्जिंग स्पीडचा फोन टेक्नोलॉजीवर काम करीत असून २०२१ मध्ये हा फोन मार्केटमध्ये येवू शकतो. या ठिकाणी १२० वॉट चार्जिंग साठी 4500mAh ची बॅटरी केवळ २३ मिनिटात फुल चार्ज होते. तर 200W+ चार्जिंग स्पीडमुळे केवळ १५ मिनिटात चार्ज होणार आहे. वाचाः Mi 10 Ultra ची खास वैशिष्ट्ये या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस ओलेड डिस्प्ले मिळतो. यात १६ जीबी पर्यंत रॅम, ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८६५ प्रोसेसर मिळतो. यात ४८ मेगापिक्सलचा प्लस २० मेगापिक्सलचा प्लस १२ मेगापिक्सलचा प्लस टेलिफोटो लेन्सचा क्वॉड रियर कॅमेरा आणि २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. वाचाः लवकरच येतोय १०८ मेगापिक्सलचा फोल्डेबल फोन या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, शाओमी Mi Mix 3 स्मार्टफोनचा सक्सेसर आणणार नाही. कंपनी फोल्डेबल फोन आणि अंडर स्क्रीन कॅमेरा टेक्नोलॉजी कॅमेरावर काम करीत आहे. एका रिपोर्टमध्ये म्हटले की, शाओमी एक फोल्डेबल फोन आणू शकते. ज्यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kYPhnH