मुंबई- चे मुख्य संपादक यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यानंतर अभिनेत्री कंगना रणौतने ट्वीट करत अर्णबला पाठिंबा दिला. सोनिया सेनेला एवढा राग का येतो? आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं कर्ज फेडावं लागेल. कंगनाने पुढे लिहिले की, 'पप्पूला पाठिंबा देणाऱ्यांना इतका राग का येतो? पेंग्विनला इतका राग का येतो? सोनिया सेनेला एवढा राग का येतो? अर्णब सर, यांना पराचा कावळा करू दे.. आपल्यावर उघडपणे हल्ला करू दे... फाशी देण्यापूर्वी त्यांच्या चेहऱ्यावर हसू असू दे.. आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्याचं कर्ज फेडायचं आहे.' योबतच कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यात तिने महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारत म्हटलं की, तुम्ही आज अर्णब गोस्वामीला त्याच्या घरी जाऊन मारलं, त्याचे केस ओढले, त्याच्यावर हल्ला केला, अजून किती घरं तोडाल? कितीजणांचे गळे दाबाल आणि किती आवाजं बंद कराल? सोनिया सेना तुम्ही किती तोंडं बंद कराल? पण ही तोंडं वाढतच जाणार आहेत. दरम्यान, २०१८ मध्ये इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांच्या मृत्यूच्या चौकशी संदर्भात अर्णब गोस्वामी यांना महाराष्ट्र सीआयडीने अटक केली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अर्णबला अलिबाग येथे नेण्यात आले आहे. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मुंबई पोलिसांनी अर्णब यांची पत्नी, मुलगा, सासू- सासरे यांची मारहाण केली असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे. रिपब्लिक टीव्हीवर सतत दाखवण्यात येणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलीस अर्णब यांच्यावर जोर जबरदस्ती करत असल्याचा दावा केला जात आहे. कोणत्या प्रकरणा संदर्भात होत आहे कारवाई हे प्रकरण २०१८ चं आहे. ५३ वर्षीय इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांची आई कुमुद नाईक यांनी अलिबागमध्ये आत्महत्या केली. घटनेनंतर एक सुसाइड नोट सापडली होती. यात अन्वयने अर्णब यांचं नाव स्पष्टपणे लिहिलं होतं. चिठ्ठीत अन्वयने स्पष्ट लिहिलं होतं की, अर्णब गोस्वामी आणि इतर दोघांनी त्याला ५.४० कोटी रुपये दिले नाही. त्यामुळे अन्वयला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. अखेर त्यांनी आईसह आत्महत्या केली.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2HYS2qK