Full Width(True/False)

बाय बाय २०२०: मराठी मालिकाविश्वाक काय काय घडलं?

चैत्राली जोशी कधीही न थांबणारं म्हणून ओळखलं जाणारं टीव्ही हे माध्यम पहिल्यांदाच लॉकडाउनच्या निमित्तानं ठप्प झालं. या वर्षाच्या सुरूवातीला नवीन मालिका वाहिन्यांवर दाखल झाल्या. पण त्यांना प्रस्थापित व्हायला पुरेसा वेळ मिळाला नाही. मार्चच्या मध्यानंतर तीन-साडे तीन महिने हे माध्यमही शांतच होतं. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत असल्यानं सगळ्यांसाठीच हा अनुभव वेगळा ठरला. त्यामुळे टीव्ही विश्वात खऱ्या घडामोडी गेल्या सहा महिन्यातच वेगानं घडल्या. जुलै महिन्यात सगळ्या वाहिन्या पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आणि या माध्यमानं वेग धरला. टीव्ही विश्वाचं हे नवं रूप अनलॉकमध्ये दिसून आलं. टीव्हीच्या आधीच प्रक्षेपण (ओव्हर द टॉप) या माध्यमाचा वेग एव्हाना सगळ्यांच्याच लक्षात आला असेल. याचं महत्त्व सर्व वाहिन्यांना देखील कळून चुकलं. टीव्हीच्या आधी वाहिनीच्या ओटीटीवर मालिका प्रक्षेपित होणं; हे पूर्वी एकाच वाहिनीबाबत घडत होतं. पण आता आणखी काही वाहिन्या याकडे वळल्या असून एका वाहिनीच्या मालिकांचे दुसऱ्या दिवशीचे भाग ओटीटीवर आदल्या दिवशी दुपारीच दिसतात. तर दुसऱ्या एका वाहिनीच्या मालिकांचे नवे भाग ओटीटीवर २४ तास आधीच बघायला मिळतात. लॉकडाउनमध्ये अनेकांचं वर्क फ्रॉम होम सुरू असल्यामुळे आपापल्या कामाच्या वेळेनुसार मालिका बघणं सोयीचं व्हावं यासाठी वाहिन्यांनी ओटीटीचा आधार घेतल्याचं काही तज्ज्ञ सांगतात. नव्याची नवलाईलॉकडाउनच्या काळात म्हणजे तीन महिने टीव्ही माध्यमही ठप्प झालं होतं. कोणत्याही मालिकांचे नवे भाग प्रक्षेपित झाले नाहीत. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मात्र वाहिन्या कंबर कसून उभ्या राहिल्या. या सहा महिन्यात एकूण २० नवीन मालिका आणि ५ कथाबाह्य शो सुरू झाले. याच सहा महिन्यात एकूण ११ मालिका बंद झाल्या. थोडक्यात काय तर गेल्या सहा महिन्यांत नवीन सुरू झालेल्या कार्यक्रमांची संख्या बंद झालेल्या कार्यक्रमांच्या दुपटीपेक्षा जास्त आहेत. प्रयोग नवे, प्रेक्षकांना हवेलॉकडाउनमध्ये चित्रीकरण बंद असल्यामुळे मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांना बघायला मिळाले नाहीत. पण तरी प्रेक्षकांसाठी कायपण असं म्हणत वाहिन्यांनी काही नवे प्रयोग केले. 'सारेगम' या कार्यक्रमाला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अनेक गायकांनी आपापल्या घरूनच गाणी गायली आणि कार्यक्रमाचं चित्रीकरण केलं होतं. तर '' ही नवी कोरी मालिका सुरू झाली. लॉकडाउनमध्ये सुरू होणारी ही पहिली मालिका ठरली. तर '' या मालिकेतील देशमुख कुटुंबानंही एक छोटासा वेबिसोड केला होता. लॉकडाउन आणि घरकामात आईला मदत हा विषय घेऊन त्यांनी घरूनच चित्रीकरण केलं होतं. हा भाग टीव्हीवर न दाखवता वाहिनीच्या सोशल मीडियावर दाखवला होता. वाढता वाढे मालिकासाधारणपणे संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० हा प्राइम टाइम मानला जात असे. पण आता या प्राइम टाइमची लांबी वाढली आणि तो संध्याकाळी ६.३० ते १०.३० असा झाला. जवळपास सगळ्याच वाहिन्यांवर असाच प्राइम टाइम असल्यानं प्रत्येक वाहिनीवर ७-८ मालिका प्रक्षेपित होताहेत. त्यामुळे सध्या साधारण ३०-३५ प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. प्राइम टाइम वाढल्यानं मालिकांची संख्या वाढली. त्यामुळे वाहिन्यांमधली स्पर्धाही चुरशीची झाली आहे. टीआरपी नाही, मालिका बंदमालिकांचं मोजमाप टीआरपीच्या पट्टीवर होतं. टीआरपी (टेलिव्हिजन रेटिंग पाँइंट) नाही तर प्रायोजक, जाहिराती नाहीत. या दोन गोष्टी नाहीत तर उत्पन्नात नफा नाही. नफा नाही तर मालिकाही नाही. असं एकमेकांना जोडलेलं हे गणित आहे. याच नियमानुसार अनेक मालिकांना या वर्षी निरोप द्यावा लागला. उघडपणे हे कारण सांगितलं जात नसलं तरी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर', 'वैजू नंबर वन', 'सावित्रीजोती', 'प्रेमाचा गेम सेम टू सेम', 'मिसेस मुख्यमंत्री', 'नवरी मिळे नवऱ्याला' अशा काही मालिका या वर्षी संपल्या. 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' आणि 'सावित्रीजोती' या मालिकांच्या बंद होण्याबाबत सोशल मीडियावर नाराजी व्यक्ती झाली होती. दुसरा सीझन 'ह.म. बने तु.म. बने' या कौटुंबिक मालिकेने दोन वर्षं प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर या वर्षी निरोप घेतला. पण ही मालिका संपताना पूर्णविराम घेत नसून स्वल्पविराम आहे असं सांगितलं गेलं. या मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार असं सांगण्यात आलं. 'सावित्रीजोती' ही मालिकाही टीआरपीच्या कारणामुळे गेल्या आठवड्यात संपली. पण निर्माते या मालिकेच्या दुसऱ्या सीझनबद्दल वाहिनीशी चर्चा करत असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे येणाऱ्या वर्षात या मालिकेचाही दुसरा सीझन दिसण्याची शक्यता आहे. काही रिअॅलिटी शो, कथाबाह्य शो यांचाही दुसरा सीझन येऊ शकतो.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2L4bzr9