Full Width(True/False)

डायल केलेला नंबर तपासून पाहा...नव्या वर्षापासून होणार 'हे' खास बदल

नवी दिल्लीः देशात लँडलाइनवरून मोबाइल फोनवर कॉल करण्यासाठी ग्राहकांना १ जानेवारी २०२१ पासून १० नंबरच्या आधी शून्य लावावे लागणार आहे. दूरसंचार विभागाने यासंबंधीचा चा एक प्रस्ताव मंजूर केला आहे. हा बदल १ जानेवारी या नवीन वर्षापासून केला जाणार आहे. म्हणजेच आता १० नंबर डायल करण्याऐवजी ११ नंबर डायल करावे लागणार आहेत. या नवीन बदलामुळे दूरसंचार कंपन्यांना मोठा फायदा मिळणार आहे. वाचाः भारतीय दूरसंचार नियामक मंडळ (TRAI) ने या कॉलसंबंधी २९ मे २०२० रोजी आधी शून्य (0) लावण्याची शिफारस केली होती. दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपन्याला अधिक नंबर बनवण्यासाठी सुविधा मिळणार आहे. दूरसंचार विभागाने २० नोव्हेंबर रोजी एक सर्क्यूलर मध्ये म्हटले आहे की, लँडलाइन वरून मोबाइल नंबर डायल करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची ट्रायची सूचना मंजू करण्यात आली आहे. याआधी मोबाइल आणि लँडलाइन सेवेसाठी पर्याप्त नंबर बनवण्याची सुविधा मिळणार आहे. या प्रसिद्धीप्रकाच्या माहितीनुसार, हे नियम लागू झाल्यानंतर लँडलाइनवरून मोबाइल फोनवर कॉल करण्यासाठी नंबरच्या आधी शून्य डायल करणे बंधनकारक होणार आहे. वाचाः दूरसंचार विभागाने म्हटले आहे की, दूरसंचार कंपन्याला लँडलाइनच्या सर्व ग्राहकांना शून्य डायल करण्याची सुविधा द्यावी लागेल. ही सुविदा आपापल्या क्षेत्राबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे. दूरसंचार कंपन्यांना या नवीन पद्धत अवलंब करण्यासाठी १ जानेवारी २०२० पर्यंत वेळ दिला आहे. नंबर डायल करण्याच्या नवीन पद्धतीमुळे दूरसांचर कंपन्यांना मोबाइल सेवेसाठी २५४.४ कोटी अतिरिक्त नंबर करण्याची सुविधा मिळणार आहे. हे भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o2NVcD