Full Width(True/False)

चित्रपटाच्या नावाचा वाद; मधुर भांडारकर यांच्या आरोपांवर करणनं दिलं स्पष्टीकरण

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील दोन प्रसिद्ध दिग्दर्शकांमध्ये वाद सुरू आहे. या वादाचं कारण आहे. चित्रपटाचं नाव. बॉलिवूडमध्ये अनेकदा चित्रपटांच्या नावावरुन किंवा त्यांच्या अधिकारावरुन वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असाच वाद प्रसिद्ध दिग्दर्शक आणि यांच्यात सुरू आहे. मधुर भांडारकर यांनी करण जोहर आणि अपूर्व मेहता यांच्यावर चित्रपटाचं नाव चोरल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी करण जोहरनं आता एक पत्रक जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. चित्रपटाच्या नावाचा वाद सुरू झाल्यापासून मधुर भांडारकर यांनी करणच्या धर्मा प्रोडक्शन यां कंपनीला चार ते पाच वेळा नोटील पाठवली आहे. धर्मा प्रोडक्शनकडून एकाही नोटिशीला उत्तर देण्यात आलं नाहीए. आता करणनं एक पत्रक जारी करत त्याची बाजू मांडली आहे. करण जोहरचं स्पष्टीकरणआपण अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखतोय. या बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाग आहोत. मी नेहमीच तुझं आणि तुझ्या कामाचं कौतुक केलं आहे. तुला नेहमी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तू काही दिवसांपासून आमच्यावर नाराज आहे. मला त्याचं कारणंही माहित आहे. त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. मला हे स्पष्ट करायचं आहे की, आम्ही आमच्या सीरिजच्या नावात बदल केलं आहे. आम्ही सीरिजसाठी नवीन नावाचा विचार केला आहे. फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ () नसून बॉलिवूड वाइव्ज (Fabulous Lives), असं असणार आहे. सोशल मीडियावर देखील याच नावानं आमची सीरिज प्रमोट करण्यात येईल, असं करणनं त्याच्या पत्रकात म्हटलं आहे. काय आहे वाद? मधुर भांडारकर सध्या कलाविश्वातील सुपरस्टार्सच्या पत्नींवर आधारित चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाचं नाव 'बॉलिवूड वाइव्ज' असं आहे. मात्र, याच काळात करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी 'Fabulous Lives of Bollywood Wives' या सीरिजची घोषणा केली. मात्र, या सीरिजच्या नावावरुन मधुर यांनी संताप व्यक्त केला आहे. 'या नावाशी संबंधित चित्रपट मी करत असून करण आणि अपूर्व यांनी हेच नाव त्यांच्या सीरिजला देणं चुकीचं आहे', असं मधुर यांनी म्हटलं आहे. सोबतच त्यांनी या प्रकरणी इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशनकडे (आय़एमपीपीए) याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 'करण जोहर आणि अपूर्व मेहतानं मला या सीरिजचं नाव 'बॉलिवूड वाइव्ज' असं ठेवलं तर चालेल का? असं विचारलं होतं. त्यावेळी मीदेखील याच नावानं चित्रपट करत आहे, त्यामुळे हे नाव ठेऊ नका, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं. मात्र, तरीदेखील त्यांनी त्यांच्या सीरिजचं नाव 'Fabulous Lives of Bollywood Wives' असं ठेवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. कृपा करुन माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करू नका. माझी नम्र विनंती आहे तुम्ही या सीरिजचं नाव बदला', असं ट्विट मधुर यांनी केलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2KCUK6l