Full Width(True/False)

फालतू हिरॉईन म्हणणाऱ्या ट्रोलरची तापसीनं केलं बोलती बंद

मुंबई टाइम्स टीम सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. त्यात अर्थात सेलिब्रिटींचं होण्याचं प्रमाण अधिक असतं. काहीजण अशा ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. तर काहीजण त्यांना सडेतोड उत्तर देतात. सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असणारी अभिनेत्री हिनं नुकतंच एका ट्रोलरला बेधडक उत्तर दिलं आहे. या ट्रोलरनं तापसीला इन्स्टाग्रामवर 'डीएम' (डायरेक्ट मेसेज) केले होते. त्याचा स्क्रीनशॉट शेअर करत तापसीनं त्याला उत्तर दिलं. 'फालतू हिरॉईन.. तुझे अॅक्टिंग तो आती नहीं, उठा उठा के मूव्ही करती है', असा मेसेज त्या ट्रोलरनं तापसीला केला होता. त्यावर तिनं उत्तर दिलं, 'एक्झॅक्टली क्या उठा उठा के? क्यूंकी उठाया तो है मैंने.. स्टँडर्ड. पर आपको शायद नहीं समझ आया' (अभिनयाची पातळी मी उंचावर नेली पण कदाचित तुम्हाला ते समजलं नाही.) यानंतर त्या ट्रोलरनं तापसीला पुन्हा मेसेज करत शिवीगाळ केली. त्याचाही स्क्रिनशॉट शेअर करत तापसीनं लिहिलं, 'ओह.. किती सातत्य आहे तुमच्या कामात. अजून चार-पाच वेळा हेच म्हणालात तरी मी ऐकून घेईन.' या ट्रोलिंगच्या प्रकरणाची तापसी आता पोलिसांकडे तक्रार करणार असल्याचं कळतंय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/377NS8R