Full Width(True/False)

अर्जुन कपूरने हळूच क्लिक केला मलायका अरोराचा फोटो, म्हणाला..

धर्मशाला- आणि दोघंही सध्या धर्मशाला येथे आहेत. एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवण्यासाठी त्यांनी थेट उत्तराखंड गाठलं. दोघांचेही धर्मशालेच्या रस्त्यांवर फिरतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. आता अर्जुननेही त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर मलायकाचा फोटो शेअर केला आहे. धर्मशालात सैफ, करीना आणि तैमूरसुद्धा आहेत अर्जुनने पोस्ट केलेल्या फोटोत मलायकाचा चेहरा दिसत नाही. ती अर्जुनकडे पाठ करून बसली आहे. तिने मल्टीकलरचंचे चेक आउटफिट घातलं आहे. मलायकाच नाही तर करीना कपूर- खान, सैफ आणि तैमूरसुद्धा धर्मशाला येथे आहेत. सिनेमाच्या चित्रीकरणासाठी हे तिघं तिथे गेले. चित्रीकरणासोबतच एकमेकांसोबत थंड ठिकाणी वेळ घालवण्यातही येईल. 'भूत पुलिस' सिनेमाच्या चित्रीकरणासाठी धर्मशालेत पोहोचली टीम अर्जुन आणि सैफ डलहौसी येथे भूत पोलिस या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेले आहेत. त्यांच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतमदेखील या सिनेमात आहेत. पहिल्यांदाच सैफ आणि अर्जुन एकत्र एका सिनेमात काम करताना दिसणार आहेत. या सिनेमात दोघेही घोस्टबस्टरची भूमिका साकारत आहेत. वैयक्तिक नात्यांबद्दल बोलायचं झालं तर करिना आणि मलायका फार जवळच्या मैत्रिणी आहेत. दोघी अनेकदा एकत्र फिरायला जाताना आणि पार्टी करताना दिसतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3kQ9xY5