Full Width(True/False)

इम्रान खानला पाकिस्तानचे PM समजून केला मेल, दिलं भन्नाट उत्तर

मुंबई- आमिर खानचा भाचा इम्रान खानने 'जाने तू या जाने ना' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता त्याने अभिनेता म्हणून यापुढे काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरी त्याच्याशी संबंधित एक जुना किस्सा व्हायरल होत आहे. २०१८ मध्ये हा किस्सा घडला. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि बॉलिवूड अभिनेत्याच्या नावात समानता असल्यामुळे हा किस्सा घडला होता. एका व्यक्तीने अभिनेत्याला पाकिस्तानचे पंतप्रधान मानत त्यासंबंधीचा एक मेल केला होता. मेलमध्ये लिहिलेल्या या सर्व गोष्टी मेलमध्ये लिहिलं होतं, प्रिय पंतप्रधान इम्रान खान साहेब. यशस्वी नेते योग्य वेळी योग्य निर्णय घेतात. तो खरा मित्र, खरा समर्थक आणि एक विश्वासार्ह टीम निवडतो. हे १० वर्ष जुनं प्रशासन आहे आणि तुम्ही पहिल्याच दिवशी टीममध्ये सहभागी व्हावं असं आम्हाला वाटतं. इम्रानने हे उत्तर दिले सुरुवातीला हा मेल पाहून इम्रान आश्चर्यचकित झाला होता. यानंतर त्याने पंतप्रधान असल्याचं दाखवत सोशल मीडियावर या मेलला प्रत्युत्तरही दिलं होतं. त्याने लिहिले की, मला वाटतं की लवकरात लवकर कारवाई करावी लागेल. या आठवड्यात मी काही धोरणं राबवण्यास सुरुवात करणार आहे. यासंबंधीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देतच राहीन.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lIsxc8