Full Width(True/False)

विराट कोहली टूथब्रशने साफ करत होता बूट, अनुष्काने हळूच घेतला फोटो

मुंबई- आणि सध्या दुबईत आहेत. ते लवकरच आई- बाबा होणार आहे. सध्या गरोदरपणातील हा काळ दोघंही चांगला एन्जॉय करत आहेत. दोघांचे आयपीएलच्या काळातले अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले. यावर अनेक चर्चाही झाल्या. दरम्यान आता अनुष्काने नवऱ्याचा विराटचा बूट साफ करतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. विराट बाथरूमच्या सिंकमध्ये धूत होता चिखलात माखलेले बूट अनुष्काने तिच्या इन्स्टा स्टोरीवर एक फोटो पोस्ट केला. यात विराट त्याचे बूट साफ करताना दिसत आहे. विराट बाथरूमच्या सिंकमध्ये आपल्या टूथब्रशने बूट साफ करत होता. या फोटोला कॅप्शन देताना अनुष्काने लिहिले की, 'दौऱ्याच्याआधी नवरा तन्मयतेने त्याचे स्पाईक्स साफ करत आहे.' जानेवारी २०२१ मध्ये येणार नवा पाहुणा विराट आणि अनुष्काच्या घरी पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यासाठीच विराटने सुट्टीसाठी अर्ज केला होता. विशेष म्हणजे विराटला बीसीसीआयकडून ही रजा मिळाली आहे. ऑगस्टमध्ये विराट- अनुष्काने ते आई- बाबा होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. यात अनुष्काने आपला बेबी बंप दाखवत जानेवारीमध्ये नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं होतं. सध्या विराट अनुष्काकडे विशेष लक्ष देत आहे. नुकताच विराटच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ आणि फोटोही समोर आले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lkDzEf