Full Width(True/False)

बाबा निरालाचा पर्दाफाश होणार ? 'आश्रम' चा दुसरा सीझन उद्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई: आपल्या देशाला हे 'धार्मिक बाबा' प्रकरण नवीन नाही. चंद्रास्वामीपासून ते बाबा रामरहीम पर्यंत, अनेक हाय प्रोफाइल बाबा आपल्याकडे सामान्य लोकांच्या आणि राजकीय चर्चांचाही भाग आहेत. सध्या गल्ली-बोळांत बाबालोकांचं पेव फुटलं आहे. दिग्दर्शक यांची '' ही वेह सीरिज अशाच धर्माला धंदा बनवणाऱ्या 'आश्रमा'वर आणि ती आश्रमाच्या व्यवस्थेवर प्रकाशझोत टाकते. पहिल्या सीझनला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर 'आश्रम' चा दुसरा सीझन उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेली 'आश्रम' ही 'वेब सीरिज' २८ ऑगस्ट या दिवशी 'एमएक्स प्लेअर'वर प्रदर्शित झाली होती. अवघ्या दोन ते तीन महिन्यांच्या आतच या सीरिजचा दुसरा सीझन 'एमएक्स प्लेअर'वर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ११ नोव्हेंबरला म्हणजेच उद्या 'आश्रम' मालिकेचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. '' असं या नव्या भागाचं शीर्षक आहे. अभिनेता यानं या वेब सीरिजमध्ये 'बाबा निराला' या नावाची मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. तर मराठमोळी अभिनेत्री आदिती पोहनकर देखील मुख्य भूमिकेत आहे. तर दर्शन कुमार, बाबाचा उचंदन रॉय सन्याल,अध्ययन सुमन,अनुप्रिया गोएंका, त्रिधा चौधरी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या मालिकेला विरोध करण्याचा प्रयत्नही काही संघटनांनी केला होता. मात्र प्रेक्षकांनी या मालिकेला उदंड प्रतिसाद दिला होता. पहिला भाग जिथे संपला तिथून नव्या भागाची सुरुवात होईल. पहिल्या सीझनमध्ये पडलेल्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना या दुसऱ्या भागात मिळणार असून अनेक महत्त्वाचे खुलासे होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. वाचा:वाचा:


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2IlqDPO