मुंबई- '' मध्ये काही दिवसांपूर्वी जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल एक वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर शिवसेना आणि मनसेने 'बिग बॉस'चं चित्रीकरण थांबवण्याची धमकीही दिली होती. जानने या प्रकरणात क्षमा मागितल्यानंतरचं हे प्रकरण मिटलं होतं. आता पुन्हा एकदा या सीझनमध्ये नवा वाद डोकं वर काढत आहे. यावेळी करणी सेनेने शो मेकर्स आणि होस्ट सलमान खानवर अडल्ट कन्टेट आणि लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप केला आहे. तसेच सेनेने 'बिग बॉस १४' वर बंदी घालण्याचीही मागणी केली आहे. 'बिग बॉस'शी संबंधित माहिती देणाऱ्या ' द खबरी' या इन्स्टाग्राम अकाउंटवर करणी सेनेचं निवेदन शेअर करण्यात आलं आहे. यात राजपूत करणी सेनेने लिहिले आहे की, 'एका भागात पवित्र पुनियाच्या गालावर एजाज खानने किस केलं. किसिंगचे हे प्रोमो चांगलाच ट्रेण्ड करत होता. कलर्स टीव्हीनेही त्याचं प्रमोशन केलं होतं. हा शो अश्लीलतेला उत्तेजन देणारा आणि देशाच्या सामाजिक मूल्यांशी खेळणारा शो आहे असा आमचा विश्वास आहे.' 'हा कार्यक्रम देशाच्या सांस्कृतिक मूल्यांच्या विरोधात आहे. यात अनेक आक्षेपार्ह दृष्यही दाखवण्यात येत आहेत. 'बिग बॉस १४' लव्ह जिहादचा प्रचार आणि प्रसार करत आहे, हे अस्वीकार्य आहे. म्हणूनच आम्ही कलर्स टीव्हीच्या 'बिग बॉस' शो वर बंदी घालण्याची मागणी करत आहोत. दरम्यान, 'बिग बॉस १४' यापूर्वीही अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पण लोकप्रियतेच्या दृष्टीने हा सीझन फारसा चांगला चालत नाहीए. या सीझनमध्ये हवी तशी टीआरपीही मिळत नाही. मागच्या सीझनने टीआरपीने सर्व विक्रम मोडले होतो. आतापर्यंतच्या सर्व सीझनपैकी १३ वी सीझन हा सर्वात हिट सीझन होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35GWDah