Full Width(True/False)

'झुंड'चं प्रदर्शन पुन्हा रखडलं; प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास कोर्टाचा नकार

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक यांच्या '' चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चाहते प्रदर्शनाची वाट पाहत असतानाच निराश करणारी बातमी समोर येत आहे. चित्रपटाचा वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीएत. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी हैदराबादमधील दिग्दर्शक यांनी चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस बजावली आहे. हे प्रकरण सध्या कोर्टात असून कोटानं या चित्रपटाच्या प्रदर्शनावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला 'झुंड' चित्रपट प्रदर्शित करण्यास दिवाणी कोर्ट आणि तेलंगणा उच्च न्यायालयानं दिलेली स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयानं बुधवारी नकार दिला आहे. काय आहे वाद?नंदी चिन्नी कुमार यांनी दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेते , निर्माते कृष्णन कुमार आणि टी सिरीजचे भूषण कुमार यांना नोटीस बजावली आहे. झुंड चित्रपटाच्या टीमनं कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुमार असा दावा करतात की २०१७ मध्ये त्यांनी अखिलेश पॉल याच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याचे हक्क विकत घेतले. २०१० साली ब्राझील येथे झालेल्या होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपच्या भारतीय संघाचा अखिलेश कॅप्टन होता. झोपडपट्टीत राहणारा, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या अखिलेशचे आयुष्य फुटबॉलमुळे कसे बदलते अशी चित्रपटाची कथा असणार आहे. दुसरीकडे नागराज मंजुळेच्या झुंडची कथा अखिलेशचे प्रशिक्षक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. परंतु, विजय बरसे यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवताना अखिलेशलची कथा चित्रपटाच्या कथानकात महत्त्वाची ठरते. त्यामुळे सहाजिकच झुंडमध्ये अखिलेशची कथाही दाखवली जाणार. याच कारणानं झुंडच्या टीमकडून कॉपीराइटच उल्लंघन झाल्याचं कुमार यांचं म्हणणं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/374j351