Full Width(True/False)

सुशांत केस: यूट्यूबरने 'फेक' व्हिडिओ टाकून कमावले १५ लाख!

मुंबई- बिहारमधील एका यूट्यूबरवर याच्यासंबंधी फेक स्टोरी चालवल्याचा आरोप करण्यात आला आहे. या युट्यूबरने अवघ्या चार महिन्यांत त्याच्या चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओंमधून १५ लाख रुपयांची कमाई केल्याची माहिती या प्रकरणाचा तपास केल्यानंतर समोर आली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अक्षय कुमार यांच्या विरोधात पोस्ट 'मिड डे'च्या अहवालानुसार आरोपी बिहारमधील एक अभियंता असून त्याचे स्वतःचे 'एफएफ न्यूज' नावाचं चॅनल आहे. त्याच्यावर बदनामी, सार्वजनिक गैरव्यवहार आणि हेतुपुरस्सर एखाद्याचा अपमान केल्याचा आरोप आहे. या अहवालानुसार मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार, आदित्य ठाकरे आणि अक्षय कुमार यांच्याविरोधातल्या अनेक पोस्ट या चॅनलवर होत्या. विशेष म्हणजे या पोस्टना लाखो हिटही मिळाले आहेत. सुशांतवर पोस्ट केल्यानंतर सदस्य वाढले अहवालात असंही म्हटले आहे की आरोपीने यापूर्वी सुशांतच्या मृत्यूबद्दल पोस्ट केलं होतं. ती पोस्ट बऱ्याच लोकांनी पाहिली. यानंतर तो याच धाटणीनीचे अनेक पोस्ट शेअर करत राहिला. सप्टेंबरपर्यंत त्या जवळपास ६.५ लाख रुपये मिळाले. एवढंच नाही तर आरोपीचे यूट्यूब सबस्क्राइबरही झपाट्याने वाढले. मीडिया रिपोर्टनुसार, सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्या यूट्यूब अकाउंटवर २ लाख सबस्क्राइबर होते. मात्र यानंतर फेक व्हिडिओजमुळे त्याचे सबस्क्राइबर ३.७० लाखांपर्यंत पोहोचले. सुशांतच्या मृत्यूचा फायदा लोकांनी घेतला एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने आपल्या निवेदनात म्हटलं की सुशांतच्या मृत्यूमुळे काही लोकांसाठी पैसे कमविण्याची संधी मिळाली. याचं मुख्य कारण म्हणजे लोक या प्रकरणात खूप रस घेत होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38VMoRu