Full Width(True/False)

BSNL ग्राहकांसाठी गुड न्यूज, असं मिळवा फ्रीमध्ये सिमकार्ड

नवी दिल्लीः बीएसएनएल ग्राहकांसाठी () एक मोठी गुड न्यूज आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने काही नियम आणि अटी सोबत फ्रीमध्ये सिम कार्ड देण्याची घोषणा केली आहे. याद्वारे कंपनी भारतभर विस्तार करण्याचा प्रयत्नात आहे. तर एअरटेल, जिओ आणि वोडाफोन-आयडिया सह अन्य टेलिकॉम कंपन्यांना टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे. वाचाः सध्या बीएसएनएलच्या प्रत्येक सिमकार्डसाठी २० रुपये चार्ज आकारला जातो. परंतु, आता लिमिटेड ऑफर अंतर्गत १४ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर या दरम्यान बीएसएनएल सिम कार्ड फ्रीमध्ये मिळवता येवू शकते. एन्ट्री लेवल ब्रॉडबँड प्लानला अपग्रेड करण्यासोबतच फ्रीमध्ये सिम देण्याच्या घोषणेमुळे बीएसएनएल ग्राहक वाढण्याची शक्यता आहे. वाचाः काय करावे लागेल प्रत्येक टेलिकॉम कंपन्या आता नवीन सिम कार्डच्या बदल्यात काही ना काही चार्ज आकारत असते. त्याला एफआरसी म्हणजेच फर्स्ट रिचार्ज मध्ये कापून घेते. बीएसएनएल ग्राहकांना जर फ्री मध्ये सिम कार्ड हवे असेल तर त्यांना आधी १०० रुपयांचे रिचार्ज करावे लागेल. बीएसएनएल ग्राहक आपल्या जवळच्या बीएसएनएल स्टोरवर जावून फ्री मध्ये सिम कार्ड घेवू शकतात. त्यानंतर आपल्या पसंतीनुसार, एफआरसी करु शकतात. वाचाः बीएसएनएलचा विस्तार होणार पुढील वर्ष हे एमटीएनएलचे अखेरचे वर्ष आहे. म्हणजेच पुढील वर्षापासून दिल्ली आणि मुंबई यासारख्या महानगरात एमटीएनएलच्या ऐवजी बीएसएनएलचा जलवा पाहायला मिळू शकतो. तसेच कंपनीचा विस्तार आणखी वाढू शकतो. पुढील वर्षी देशभरातील २० टेलिकॉम सर्कलमध्ये बीएसएनएलची उपस्थिती दिसेल. बीएसएनएलने या फेस्टिव सीजनमध्ये आपल्या सर्व सर्कलसाठी जबरदस्त ऑफर्सची घोषणा केली होती. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IFrnjh