Full Width(True/False)

आर्यन खानला क्रूझ पार्टीत घेऊन जाणारा अरबाज मर्चंट आहे तरी कोण?

मुंबई : बॉलिवूड स्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, आणि त्याचे कारण आहे शनिवारी रात्री क्रूझ शिपवर झालेली रेव्ह पार्टी. एका शानदार शिपमधील पार्टीमध्ये एनसीबीने छापेमारी करत शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबतच आठ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये अरबाज मर्चंटचे देखील नाव समाविष्ट आहे. अरबाज सेठ मर्चंट हा तोच आहे, ज्याच्यासोबत अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवालाचे नाव जोडले गेले आहे. रेव्ह पार्टी 'कॉर्टेलिया द इम्प्रेस' क्रूझवर सुरू होती. असे सांगितले जाते की, ज्यावेळी एनसीबीने छापेमारी केली त्यावेळी पार्टीमध्ये 600 व्यक्त उपस्थित होते. या प्रकरणात ज्यांना ताब्यात घेण्यात आले आहे, त्या व्यक्तींमध्ये मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जसवाल, विक्रांत चोकेर, गोमित चोपडा, आर्यन खान व अरबाज सेठ मर्चंट यांचा सहभाग आहे. अरबाज मर्चंटची अनेक प्रसिद्ध कलाकारांच्या मुलांशी चांगली मैत्री आहे. आलिया फर्निचरवाला ही न्यूयॉर्कमध्ये शिकत होती, तेव्हा ती अरबाज मर्चंटसोबत डेटिंग करत असल्याचे समोर आले होते. त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते, तेव्हापासून त्यांच्या डेटिंगची अफवा उठली होती. त्यानंतर 'जवानी दिवानी' चित्रपटाची अभिनेत्री आलिया बाळासाहेब ठाकरेचे नातू ऐश्वर्य ठाकरेला डेट करत असल्याच्या बातम्या अनेक दिवस येत होत्या. मात्र एका मुलाखतीमध्ये आलियाने ऐश्वर्यला तिचा एक चांगला मित्र असल्याचे सांगितले होते. एनसीबीने ताब्यात घेतलेला अरबाज मर्चंट एक अभिनेताही आहे आणि असे म्हटले जाते की, आर्यन खानसोबत त्याची चांगली मैत्रीदेखील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अरबाज हाच आर्यनला या पार्टीमध्ये घेऊन गेला होता. त्याव्यतिरिक्त मोहक, नुपूर व गोमित दिल्लीतील रहिवासी आहेत. मोहक व नुपूर फॅशन डिझायनर आहेत. नुपूर गोमितसोबत मुंबईत आली होती. गोमित एक हेअर स्टायलिस्ट आहे. अमली पदार्थांचा असा झाला क्रूझमध्ये शिरकाव! म्हटले जाते की, एनसीबीच्या पथकाला आढळून आलेले अमली पदार्थ हे महिलाच्या पर्सच्या हॅंडलमध्ये, पॅंटच्या शिलाईमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईच्या भागात आणि कॉलरमध्ये लपवून क्रूझवर नेण्यात आले होते, ज्यामध्ये अमली पदार्थांच्या अनेक प्रकारांचा समावेश आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3orcmUP