Full Width(True/False)

Jio ने आणले ३ नवे 'ऑल-इन-वन' प्लान्स, ३३६ दिवसांपर्यंत कॉलिंग आणि डेटा फ्री

नवी दिल्लीः टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा वाढली आहे. प्रीपेड युजर्ससाठी टॉपवर आहे. आता कंपनी जिओ फोन युजर्ससाठी तीन नवीन ऑल इन वन वार्षिक प्लान्स आणले आहे. कंपनीने हे प्लान्स युजर्संसाठी घोषित केले आहे. कंपनीचे तीन नवीन प्लान्स ३३६ दिवसांची वैधतेसोबत येते. यात वेगवेगळे डेटा आणि बेनिफिट्स युजर्संना मिळते. वाचाः जिओचा १००१ रुपयांचा ऑल इन वन प्लान रिलायन्स जिओचा हा प्लान ३३६ दिवसांच्या वैधते सोबत येतो. जिओ अॅप्सच्या कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन मिळते. याशिवाय प्लान ४९ जीबी हाय स्पीड डेटा पूर्ण ३३६ दिवसांसाठी देण्यात येतो. रोज १५० एमबी डेटा युजर्संना मिळतो. रोज १०० एसएमएस शिवाय या प्लानध्ये जिओ ते जिओ वर अनलिमिटेड कॉलिंग आणि बाकी नेटवर्क्सवर कॉलिंग साठी १२००० मिनिट मिळतात. वाचाः जिओचा १३०१ रुपयांचा ऑल इन वन प्लान जिओ फोन युजर्ससाठी या प्लानमध्ये एकूण १६४ जीबी डेटा मिळतो. रोज ५०० एमबी हाय स्पीड डेटा युजर्संना वापरता येतो. ३३ दिवसांच्या वैधतेसोबत या प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस, अनलिमिटेड जिओ ते जिओ कॉलिंग आणि बाकी नेटवर्क्सवर कॉलिंग साठी १२००० मिनिट्स मिळतात. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन ऑफर केले जाते. वाचाः जिओचा १५०१ रुपयांचा ऑल इन वन प्लान रोज १.५ जीबी डेटा युजर्सला ऑफर करणाऱ्या या प्लानची वैधता ३३६ दिवसांची आहे. या प्लानमध्ये एकूण ५०४ जीबी डेटा दिला जातो. रोज १०० फ्री एसएमएस सुद्धा युजर्संना दिले जाते. या प्रमाणे एकऊम ५०४ जीबी डेटा आणि रोज १०० फ्री एसएमएस युजर्संना मिळतो. जिओ ते जिओ नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग शिवाय बाकीच्या नेटवर्क्सवर कॉलिंगसाठी १२ हजार मिनिट मिळतात. हा प्लान जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन युजर्संना देतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p061xu