Full Width(True/False)

Tecno चा धमाका, टेक्नो फेस्टिवलमध्ये कार-बाईक जिंकण्याची संधी

नवी दिल्लीः बजेट स्मार्टफोन कंपनी टेक्नोने भारतात ३ वर्षात ६० लाखांहून जास्त स्मार्टफोनची विक्री केली आहे. या निमित्त कंपनीने ग्राहकांसाठी एका खास फेस्टिव ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफरमध्ये मारुती कार, हिरो बाईक आणि स्मार्टफोन सह खूप बक्षिस जिंकण्याची संधी मिळणार आहे. टेक्नोने Great Festival ची घोषणा केली आहे. यात ग्राहक १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर पर्यंत स्मार्टफोन खरेदीवर काही ना काही तरी आकर्षक भेटवस्तू घरी घेवून जावू शकतात. वाचाः फेस्टिवल ग्राहकांना आकर्षक बक्षीसे जिंकण्‍याची संधी देईल, ज्‍यामध्‍ये मारूतीची एस-प्रेसो कार, हिरो पॅशन प्रो मोटरसायकल्‍स, तसेच टेक्‍नोचा कॅमेरा-केंद्रित कॅमॉन १५ प्रो आणि कोणत्‍याही टेक्‍नो स्‍मार्टफोनच्‍या खरेदीवर लकी ड्रॉच्‍या माध्‍यमातून स्‍टायलिश हायपॉड्स एच२ इअरबड्स यांचा समावेश आहे. टेक्‍नो स्‍मार्टफोन्‍स खरेदी करणारे सर्व ग्राहक लकी ड्रॉमध्‍ये सहभाग घेण्‍यास पात्र ठरतील. लकी ड्रॉमध्‍ये सहभाग घेण्‍यासाठी ग्राहकांनी www.tecnomobile.in या वेबसाइटवर नोंदणी करणे आवश्‍यक आहे. तसेच यामध्‍ये त्‍यांचे नाव, संपर्क क्रमांक, पत्ता, स्‍मार्टफोनचा आयएमईआय क्रमांक, खरेदीची दिनांक, इनवॉईसची प्रत ही सर्व माहिती प्रविष्‍ट करत ७ डिसेंबरपर्यंत सबमिट करणे आवश्‍यक आहे. लकी ड्रॉ १५ डिसेंबर रोजी करण्‍यात येईल आणि विजेत्‍यांना त्‍यांनी दिलेल्‍या संपर्कावर कळवण्‍यात येईल. वाचाः या स्मार्टफोन्सवर बेस्ट डिल जर तुम्ही फेस्टिवल सीजन ग्रेट मध्ये सहभागी झालात तर कार, बाईक, स्मार्टफोनसह आकर्षक बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. Tecno Camon 16 फ्लिपकार्ट वर 2500 रुपयांच्या सूट सोबत ११ ,४९९ रुपये, Tecno Camon 15 फ्लिपकार्ट वर २००० रुपयांची सूट सोबत १०,४९९ रुपये, Tecno Spark Power फ्लिपकार्ट वर ११,९९९ रुपये, Tecno Spark Go 2020 फ्लिपकार्ट वर १५०० रुपयांच्या सूट सोबत ६,४९९ रुपयात खरेदी करू शकता. वाचाः यासोबतच टेक्नो अन्य स्मार्टफोनवर वेगवेगळ्या पद्धतीने ऑफर देत आहे. या ठिकाणी १० टक्क्यांपर्यंत तात्काळ सूट सोबत अनेक लाभ मिळत आहे. टेक्नोने गेल्या वर्षी बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये अनेक जबरदस्त मोबाइल लाँच केले आहेत. छोट्या शहरात या युजर्संची संख्या खूप वाढत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2HXZXos