मुंबई- 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेची टीम सध्या भलतीच आनंदात आहे. शोमध्ये 'अय्यर' ची भूमिका साकारणारा अभिनेता तनुज महाशब्देने तो २०२१ मध्ये आपले लग्न करणार असल्याचा खुलासा केला आहे. याचमुळे सध्या तारक मेहताची टीम प्रचंड उत्साहात आहे. एका मुलाखती तनुजने सांगितलं की जर देवाची इच्छा असेल तर पुढच्या वर्षी त्याचं लग्न होईल. तनुजने आपली ऑनस्क्रीन पत्नी मुनमुन दत्ता अर्थात बबिता यांच्याबरोबरच्या केमिस्ट्रीबद्दलही चर्चा केली. तनुज म्हणाला की तो आणि मुनमुन ऑफस्क्रीन खूप चांगले मित्र आहेत. नेटवर्क १८ शी झालेल्या चर्चेत तनुजने अय्यर या व्यक्तिरेखेबद्दलही चर्चा केली. आजही अय्यर लोकांमध्ये प्रसिद्ध आहे, पण तनुज नाही. तनुज म्हणाला की, 'मला माहीत आहे अय्यरची व्यक्तिरेखा खूप मोठी आहे. खूप लोकप्रिय आहे. पण माझा असा विश्वास आहे की लोकांना फक्त व्यक्तिरेखाच ठाऊक नसली पाहिजे, तर ते साकारणारा कलाकारही माहीत असला पाहिजे. आनंद आहे की 'तारक मेहता... ;चा एक भाग आहे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' च्या टीमचा भाग झाल्याचा आनंदही तनुजला आहे. तनुजने यापूर्वी आणखी बरेच कार्यक्रम केले आहेत. त्याला थिएटरमध्येही रस आहे. याशिवाय तो स्क्रिप्ट राइटिंगही करत असतो. तनुज म्हणतो, 'माझी विचार करण्याची पद्धत, माझा स्वभाव आता सर्वकाही माझ्या व्यक्तिरेरेसारखंच झालं असं मला वाटतं. शूट संपल्यानंतर जेव्हा मी घरी जातो तेव्हाही मी तिथे कामच करत आहे असंच वाटत असतं. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ने रचला इतिहास 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेने नुकतेच ३ हजार भाग पूर्ण केले आहेत. याआधी 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेने हा विक्रम केलेला. ३ हजार भागांपर्यंत चाललेली ही टीव्ही जगतातली दुसरी मालिका आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mLPZFp