Full Width(True/False)

WhatsApp वर येताहेत हे नवीन फीचर्स, दुप्पट होणार चॅटिंगची मजा

नवी दिल्लीः जगातील सर्वात प्रसिद्ध इंस्टेंट मेसेंजर आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवर लागोपाठ नवीन फीचर्स येत आहेत. या अॅपमध्ये लवकरच आणखी काही नवीन फीचर्स जोडले जाणार आहेत. या नवीन फीचर्सची युजर्संना फार मोठी उत्सूकता आहे. जाणून घ्या नवीन फीचर्स संबंधी. वाचाः रिड लेटर व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर अॅप आर्काइव्ड चॅट फीचरला रिप्लेस करणार आहे. हे फीचर जवळपास व्हॉट्सअॅपवरून रिमूव्ह केले गेलेले जुने व्हेकेशन फीचरप्रमाणे काम करणार आहे. या ऑप्शनला तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे इनेबल किंवा डिसेबल करू शकता. वाचाः म्यूट व्हिडिओ बिफोर सेंडिंग नावावरून याची माहिती होते. या फीचरच्या मदतीने तुम्ही कोणताही व्हिडिओ पाठवण्याआधी म्यूट करू शकता. हे फीचर इंन्स्टाग्राम आणि ट्विट यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आधीच उपलब्ध आहेत. वाचाः रिपोर्ट टू व्हॉट्सअॅप हे फीचर व्हॉट्सअॅप सर्वात महत्त्वपूर्ण फीचर्सपैकी एक आहे. या फीचरच्या मदतीने कोणत्याही युजर्सला आवश्यक नसलेले मेसेज पाठवणाऱ्याला रिपोर्ट करता येवू शकते. या फीचरवरून कोणत्याही कॉन्टॅक्टला सहज रिपोर्ट करू शकता. वाचाः नवीन इमोजी हे नवीन फीचर नाही. परंतु, लवकरच भारतात व्हॉट्सअॅपवर १३८ नवीन इमोजी साठी सपोर्ट करण्याची आशा आहे. लेटेस्ट अपडेट सोबत अँड्रॉयड बीटा युजर्ससाठी हे फीचर उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kRnIfr