नवी दिल्लीः Vivo ने कोणताही गाजावाजा न करता आपला नवीन स्मार्टफोन (2021) ला भारतात लाँच केले आहे. हा फोन आता विवो इंडिया आणि अॅमेझॉन इंडियाच्या वेबसाइटवर लिस्टेड आहे. Vivo V20 सीरीजचा हा चौथा फोन आहे. याआधी कंपनीने Vivo V20 SE, Vivo V20 आणि Vivo V20 Pro लाँच केलेले आहे. वाचाः अपडेटेड Vivo V20 ची किंमत २४ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना हा फोन मिडनाइड जॅज आणि सनसेट मेलोडी कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेट सोबत ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस (1080x2400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले दिला आहे. हा फोन Android 11 OS बेस्ड FunTouchOS 11 वर काम करतो. या फोनमध्ये ८ जीबी रॅम दिला आहे. तसेच या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. या फोनमध्ये इंटरनल मेमरी १२८ जीबी दिली आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने याचे स्टोरेज आणखी वाढवता येवू शकते. वाचाः या फोनला पॉवर देण्यासाटी 4,000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट यात दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये युजर्संना ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. डिझाइन आणि खास वैशिष्ट्ये पाहिल्यास Vivo V20 (2021) ओरिजनल Vivo V20 सारखाच आहे. या दोन्ही फोनमध्ये खास फरक म्हणजेच या फोनमधील प्रोसेसरचे आहे. V20 स्नॅपड्रॅगन 720G प्रोसेसर सोबत येतो तर V20 (2021) मध्ये SD730 प्रोसेसर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rrIir2