मुंबई- देशातील सर्वात मोठे उद्योगपती आपल्या कुटुंबामुळे बर्याचदा चर्चेत असतात. बॉलिवूडसोबत अंबानी कुटुंबाचं फार जवळचं नातं आहे. बॉलिवूडचे अनेक स्टार अंबानी कुटुंबाच्या लग्न किंवा विशेष सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात. एवढंच नाही तर घरचं कार्य असल्याप्रमाणेच ते अंबानींच्या घरात वावरताना दिसत असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमाशी संबंधित एक खास किस्सा सांगणार आहोत. २०१७ चा हा किस्सा आणि मुकेश अंबानी यांचा मुलगा यांच्यात झाला आहे. रिलायन्सला ४० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अंबानी कुटुंबियांनी गुजरातमधील जामनगर येथे एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यासोबतच शाहरुखने या कार्यक्रमाचं सूत्रसंचालनही केलं होतं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना शाहरुखने उपस्थित पाहुणे आणि अंबानी कुटुंबातील मुलांसोबत खूप मजा- मस्ती केली. इतकंच नव्हे तर आकाश अंबानी आणि ईशा अंबानी यांच्यासोबत त्याने डान्सही केला होता. यादरम्यान मुकेश अंबानी यांचा दुसरा मुलगा अनंत अंबानीने शाहरुखला असं काही सांगितलं की जे ऐकूव किंग खानची बोलतीच बंद झाली. शाहरुख सुरुवातीला स्वतःच्या पहिल्या पगाराबद्दल अनंतला सांगतो. बादशहा म्हणाला की, त्याला पहिला पगार ५० रुपये मिळाला होता. पंकज उधास यांच्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये तो स्वयंसेवक म्हणून गेला होता. एका दिवसाचे त्याला ५० रुपये मिळाले होते. यासोबतच तो पुढे म्हणाला की, पहिला पगार मिळाल्यानंतर तो ताजमहाल पाहायला गेला होता. यानंतर तो अनंतला त्याच्या पहिल्या पगाराबद्दल विचारतो. या प्रश्नावर अनंत फार मजेशीर उत्तर देतो. अनंत अंबानी शाहरुखला म्हणतो की, माझ्या पहिल्या पगाराबद्दल जाणून न घेतलेलंच बरं. कारण, जर मी माझा पहिला पगार सांगितला तर तुम्हाला लाज वाटेल. हे ऐकून शाहरुख खान गप्प बसला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39CDV5U