Full Width(True/False)

Whatsapp वर जबरदस्त फीचर, प्रत्येक युजरसाठी सेट करा वेगळे चॅट विंडो वॉलपेपर

नवी दिल्लीः जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवर खूप सारे नवीन फीचर्स येत आहेत. आता अॅपच्या लाइट आणि डार्क थीमसाठी कूल वॉलपेपर्सचा समावेश करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅप नवीन अपडेट आयओएस युजर्ससाठी आणले आहे. वॉलपेपर्स संबंधी एक खास फीचर्स आहे. आपल्या आयफोनमध्ये लेटेस्ट व्हॉट्सअॅप अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर वेगवेगळ्या चॅट विंडो मध्ये वेगवेगळे बॅकग्राऊंड लावले जावू शकता येते. वाचाः तुम्ही व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट्सच्या चॅट विंडो मध्ये आपल्या हिशोबाप्रमाणे कोणताही वॉलपेपर लावू शकता. सध्या व्हॉट्सअॅप मध्ये मिळणाऱ्या वॉलपेपर ऑप्शन मध्ये केवळ एक वॉलपेपर सेट केले जावू शकते. सर्व चॅट्स च्या बॅकग्राऊंडमध्ये दिसते. नवीन ऑप्शन सोबत युजर्स प्रत्येक चॅट साठी वेगळ्या वॉलपेपर शिवाय, डार्क मोड मध्ये वेगळे वॉलपेपर लावू शकता. युजर्सला आपल्या फोनच्या गॅलरीमधून कोणत्याही फोटोला वॉलपेपर बनवण्यासाठी कोणत्याही सॉलिड कलर किंवा डिफॉल्ट डूडल बॅकग्राउंडला निवडण्याचे ऑप्सन मिळणार आहे. वाचाः सध्या केवळ iOS यूजर्स साठी फीचर नवीन फीचर सर्च करण्याआधी तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅपचे लेटेस्ट आयओएस व्हर्जन इन्स्टॉल करणे आवश्यक आहे. WABetaInfo कडून नवीन अपडेट संबंधी ट्विट करण्यात आले आहे. for iOS 2.20.130 अॅप स्टोरवर उपलब्ध आहे. तुम्हाला वॉलपेपर सेट करण्यासाठी अडवान्स्ड फीचर्स सपोर्ट आणले आहे. काही युजर्संना अपडेट इन्स्टॉल केल्यानंतर हे फीचर मिळणार नाही. लवकरच अँड्रॉयड युजर्संसाठी यासारखेच फीचर्स दिले जावू शकते. वाचाः आपल्या आयफोनवर असा बदला वॉलपेपर >> आपल्या आयफोनला लेटेस्ट व्हॉट्सअॅप व्हर्जनवर अपडेट केल्यानंतर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. >> आयफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करून अॅपची सेटिंग्समध्ये जा. >> या ठिकाणी Chat आणि पुन्हा Chat Wallpaper ऑप्शनवर टॅप करा. >> जर Dark Mode इनेबल आहे तर अॅपमध्ये उपलब्ध डार्क मोड वॉलपेपर सिलेक्ट करा. किंवा पुन्हा फोनवरून कोणताही फोटो सिलेक्ट करा. या ठिकाणी वेगवेगळे चॅट्स आणि ग्रुप्स साठी वॉलपेपर बदलू शकता. >> जर तुम्हाला लाइट थीमसाठी वॉलपेपर बदलायचा असेल तर डार्क मोडला ऑफ करून त्यानंतर कस्टम वॉलपेपर सिलेक्ट करू शकता. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/36o3FAZ