Full Width(True/False)

वरुण धवन, नीतू कपूर करोना पॉझिटिव्ह; चित्रपटाचं शूटिंग थांबवलं

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शक्य ती सर्व काळजी घेतल्यानंतरही सिनेमा आणि मालिकेतील कलाकांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येत आहेत. अभिनेता आणि यांच्यासहीत आणखी काही जणांना चित्रपटाच्या सेटवर करोणाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. चंदिगडमध्ये ‘’ चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचं शूटिंग सध्या थांबण्यात आलं आहे. ‘जुग जुग जियो’या चित्रपटाच्या सेटवर इतर काही जणांनाही करोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं शूटिंब थांबण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण धवन, नीतू कपूर आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इतरही कलाकारांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे रिपोर्ट्स अदयापही आले नसल्याची माहिती आहे. या चित्रपटात वरुण आणि नीतू यांच्यासोबतच कियारा अडवाणी , अनिल कपूर , मनीष पॉल हे कलाकारही आहेत. करण जोहरचं धर्मा प्रोडक्शन चित्रपटाची निर्मिती करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g7K8YW