Full Width(True/False)

ही माझी सगळ्यात मोठी चूक होती...;प्रियांकानं निकबद्दल केला मोठा खुलासा

मुंबई टाइम्स टीम: बॉलिवूडची देसी गर्ल आणि तिचा फॉरेनर नवरा यांच्या लग्नाला दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. ते दोघं एकमेकांसोबत वेळ घालवतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. पण, प्रियांकाने जर तिची चूक मान्य केली नसती तर आज ते दोघं एकत्र नसते याचा खुलासा तिनं एका मुलाखतीत केला आहे. प्रियांका आणि निक यांची जोडी ही बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. 'माझं निकशी लग्न होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. कारण तेव्हा मी निकला ओळखत नव्हते. त्याचा स्वभाव कसा आहे हे मला माहीत नव्हतं. मी त्याच्याबद्दल जाणून न घेताच त्याच्या विषयी माझं मत तयार केलं होतं आणि हे फार चुकीचं होतं. ही माझी सगळ्यात मोठी चूक होती', असं प्रियांका म्हणाली. पुढे ती म्हणते की, 'मी एकदा मित्रांसोबत फिरायला गेले होते. तिथून एका मीटिंगला जायचं होतं. पण, माझी इच्छा होती की निकने मला जाण्यापासून थांबवावं. त्यासाठी मी त्याला अनेक हिंट देखील दिल्या. त्यानंतर निक मला बाजूला घेऊन गेला आणि म्हणाला, तुला काय म्हणायचं आहे हे मला समजलं आहे. पण, मी तुला काम करण्यापासून कधीही थांबवणार नाही. कारण, मी त्याचं महत्त्व जाणून आहे. इथपर्यंत पोहोचण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस याची मला कल्पना आहे. म्हणून मी तुला थांबवणार नाही'. ही बाब विशेष भावल्याचं तिनं सांगितलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3g7nFLw