Full Width(True/False)

कंगनावर एकटा भारी पडला दिलजीत, म्हणाले देश आणि पंजाबची शान

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. हल्ली कंगनाला प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत मांडायचं असतं. याचमुळे तिला प्रत्येक क्षेत्रातल्या लोकांच्या रोषाचा सामना करावा लागतो. आता ट्विटरवर गायक आणि अभिनेता दिलजित दोसांज याच्याशी तिची शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. कंगनाने शेतकरी आंदोलनात सहभागी झालेली वृद्ध महिला ही सीएए आंदोलनातही सामील झाल्याचं म्हटलं होतं. या आजीचं नाव तिने बिलकिस बानो असंही लिहिलं होतं. तिने यासंबंधी ट्वीट करत म्हटलं की ही आजी १०० रुपयांच्या मानधनासाठी कोणत्याही आंदोलनात सहभागी होते. तिच्या याच ट्वीटवर दिलजीतने तिची उलट तपासणी घ्यायला सुरुवात केली. कंगना रणौत आणि यांच्या ट्विटर वॉरमध्ये दिलजीतला सिलेबसचा पाठिंबा दिला आहे. स्वरा भास्कर, अंगद बेदी, कुब्रा सैत, श्रुती सेठ यांनी त्याचं उघडपणे समर्थन केलं आहे. स्वरा भास्करने त्याला स्टार म्हटलं आहे, तर श्रुती सेठने त्याला पंजाबचा अभिमान म्हटलं आहे. पंजाब येथे राहणाऱ्या आजी मोहिंदर कौर या शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. त्यांचा फोटो पोस्ट करूनच कंगनाने वादग्रस्त ट्वीट केलं होतं. यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आजी म्हणाल्या की, 'कोणा एका अभिनेत्रीने माझ्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्याचं मला कळलं.. ती माझ्या घरी कधीच आली नाही. मी काय करते हे तिला माहीत नाही आणि मी दररोज मिळणाऱ्या १०० रुपयांसाठी काम करते असं ती बोलली. ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. माझी १३ एकरची जमीन आहे. १०० रुपयांचं मी काय करू.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lCE0cb