मुंबई: ज्येष्ठ अभिनेते फार काही व्यवस्थित नसल्याची माहिती त्यांची पत्नी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिली आहे. दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक नाहीए, सध्या त्यांची प्रचंड काळजी घ्यावी लागत आहे. करोनामुळं त्यांना विलगीकरणातच ठेवण्यात आलं असून यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली असल्याचं सायरा बानो यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपासून दिलीप कुमार यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होतेय पण त्यांची तब्येत स्थिर आहे, असं सायराबानो यांनी सांगितलं. तसंच दिलीपजींसाठी प्रार्थना करा, असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं आहे. लोकांनी माझं कौतुक करावं किंवा मला चांगलं म्हणावं,यासाठी मी दिलीप कुमार यांची काळजी घेत नाहीए. त्यांची काळजी घेण्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नाहीए. त्यांच्या सोबत राहण, त्यांचा सहवास माझ्यासाठी सर्वांत प्रिय गोष्ट आहे. माझं त्यांच्यावर खूप प्रेम आहे', असंही सायरा बानो म्हणाल्या.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qCCwlU