Full Width(True/False)

दिव्या भटनागर- 'रॉ'मध्ये काम करायचे बाबा, वर्षाच्या आतच नवऱ्याने सोडलं?

मुंबई- यंदाचं २०२० हे वर्ष सिनेसृष्टीप्रमाणेच टीव्ही जगातासाठीही वाईट ठरलं आहे. अभिनेत्री दिव्या भटनागर हिचं करोना संक्रमणामुळे निधन झालं. ती काही दिवस व्हेंटिलेटरवर होती. सहा दिवसांपासून तिच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. तिच्या शरीरातली ऑक्सिजनची पातळी ७१ पर्यंत गेली होती. दिव्या भटनागर टीव्हीच्या लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील गुलाबोच्या व्यक्तिरेखेने तिला बरीच प्रसिद्धी दिली. दिव्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होती. दिव्या भटनागरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेऊ.. १. दिव्या भटनागर कोण होती? दिव्या भटनागर एक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री होती. करोना संसर्गामुळे तिचा मृत्यू झाला. 'ये रिश्ता क्या कहलाता है' शोमधील व्यक्तिरेखेने दिव्याला बरीच प्रसिद्धी दिली होती. २. दिव्या भटनागरचा जन्म कधी झाला, तिचे वय किती होतं? दिव्या भटनागर अवघ्या ३४ वर्षांची होती. तिचा जन्म १५ सप्टेंबर १९८६ रोजी दिल्ली येथे झाला होता. ३. दिव्याच्या कुटुंबात कोण आहेत? दिव्याच्या पश्चात तिची आई डॉली भटनागर, धाकटा भाऊ देवाशीष भटनागर असा परिवार आहे. दिव्याच्या नवऱ्याचं नाव गगन आहे. तो सेलिब्रिटी मॅनेजर आणि लाइन-इन निर्माता आहे. पण दिव्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, गगनने दिव्याची फसवणूक करत तिला सोडलं होतं. ४. दिव्याच्या वडिलांनी काय केले? दिव्या भटनागरच्या वडिलांचं नाव विनय कुमार भटनागर असं आहे. ते ‘रॉ’ म्हणजेच रिसर्च अँड अ‍ॅनालिसिस विंगसाठी काम करायचे. २०१७ मध्ये दिव्याच्या वडिलांसोबत दिल्लीत एक घटना घडली होती. त्यांना डीटीसी बसमध्ये ड्रग्ज देऊन लुटले होते. या घटनेच्या काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. दिव्या अनेकदा सोशल मीडियावर तिच्या वडिलांविषयी पोस्ट शेअर करायची. ५. दिव्याला घरात कोणत्या नावाने हाक मारायचे? तिने कुठून शिक्षण घेतलं? दिव्या भटनागरला घरात दिबू नावाने हाक मारायचे. तिने विद्या भवन गर्ल्स सीनिअर सेकण्डरी स्कूल, दिल्ली येथून शिक्षण घेतले. त्यानंतर दिल्ली विद्यापिठातून पदवी घेतली. दिव्याने सेमी-क्‍लासिकल डान्समध्येही प्रशिक्षण घेतलं आहे. ६. दिव्याने अभिनयात कधी पदार्पण केलं? दिव्या भटनागरने २००६ मध्ये टीव्ही मालिका 'चांद के पार चलो' यातून अभिनयात पदार्पण केलं. २००९ मध्ये 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत गुलाबोची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर २०११ मध्ये 'सावरे सबके सपने... प्रीतो', २०१८ मध्ये 'श्रीमान श्रीमती फिर से', २०२० मध्ये 'तेरा यार हूं मैं' या मालिकांमधून तिने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. ७. दिव्या भटनागरच्या नवऱ्याचं नाव काय आहे, त्यांनी कधी लग्न केलं? दिव्या भटनागरने २०१५ मध्ये प्रियकर गगनशी साखरपुडा केला. गगन सेलिब्रिटी मॅनेजर आहे. रिपोर्ट्सनुसार, दिव्याच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. हा एक आंतरजातीय विवाह होता. दिव्या आणि गगनने २२ डिसेंबर २०१९ रोजी गुरुद्वारामध्ये लग्न केलं होतं. ८. दिव्या भटनागरचा नवरा गगनने तिच्याशी विश्वासघात केला? दिव्य भटनागरला करोना संसर्गामुळे रुग्णालयात दाखल केलं असता तिच्या आईने काही खुलासे केले. गगनने दिव्याची फसवणूक केल्याचे वृत्त दिव्याची आई डॉली भटनागर यांनी दिलं. त्याने दिव्याला सोडल्याचंही त्या म्हणाल्या. दिव्याची आई म्हणाली की, 'तिने आम्हाला न सांगता लग्न केलं. यानंतर ती ओशिवरा येथे राहत होती. ९. दिव्या भटनागरच्या नवऱ्याचं काय आहे म्हणणं? यानंतर दिव्याचा पती गगन यानेही तिच्यावतीने स्पष्टीकरण दिलं आहे. मी दिव्याची फसवणूक केली नाही किंवा तिला सोडलंही नाही असं स्पष्ट केलं. त्याने व्हिडिओ शेअर करून म्हटलं की, मी कामानिमित्त मुंबईबाहेर गेलो होतो. माझे कुटुंबीय सतत दिव्याच्या संपर्कात असतात. दिव्या आजारी पडल्यावर तिच्या मित्राने तिला इस्पितळात दाखल केलं होतं. १०. दिव्या टिकटॉकची स्टार होती का? हो, दिव्या भटनागर टिकटॉकवर खूप प्रसिद्ध स्टार होती. अॅपवर बंदी घालेपर्यंत तिने त्यावर बरेच व्हिडिओ पोस्ट केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2VMKxql