Full Width(True/False)

नगरचे 'लाली' निघाले कोलकत्याला, अनलॉकनंतर प्रथमच सादरीकरण

म.टा. प्रतिनिधी, नगर '' आणि 'तुमचं आमचं' प्रस्तुत '' हे नाटक पश्चिम बंगालची राजधानी कोलकत्ता येथे आठव्या सादर केले जाणार आहे. गुरुवारी (२४ डिसेंबर) सायंकाळी ६ वाजता गोबरदंगा नशा (कोलकत्ता) येथे नाटक सादर होणार असल्याची माहिती अभिनेता, लेखक, दिग्दर्शक कृष्णा वाळके यांनी दिली. कोलकत्ता येथील रंगयात्रा राष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे हे आठवे वर्ष आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर रंगमंचावर सादर होणारं नगरमधील हे पहिलेच नाटक आहे. लाली या नाटकाला यापूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील अंतिम व महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकविलेला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक मानाचे व प्रतिष्ठेचे असे ४५ पारितोषिके मिळालेली आहेत. गेल्या २ वर्षांपासून लालीने रंगभूमी गाजविली आहे. नाट्यक्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या नाटकाचे कौतुक केले आहे. नागपूर येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात देखील हे नाटक सादर करण्याचा बहुमान मिळालेला आहे. आणि आता हे नाटक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून थेट कोलकत्ता येथे सादर होत आहे. लाली या नाटकात संकेत जगदाळे किसन्याची भूमिका साकारत आहे. तर रेणुका ठोकळे ही आवलीची भूमिका साकारत आहे. योगीराज मोटे नाम्या तसेच ऋषभ कोंडावार अण्णाची भूमिका साकारत आहे. शुभम घोडके यांनी पार्श्वसंगित दिले आहे. तर प्रकाश योजनेची जबाबदारी स्वतः कृष्णा वाळके पार पाडत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3rkhjxx