मुंबई: नव्वदच्या दशकात आणि करिश्मा कपूरच्या ‘’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाची लोकप्रियता पाहता दिग्दर्शक डेव्हिड धवन त्याचा रिमेक प्रेक्षकांच्या भेटीस आणत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यानंतर साराचे वडिल आणि अभिनेता यानं प्रतिक्रिया दिली आहे. हा ट्रेलर सारा आणि वरूण धवनच्या चुंबन दृश्यामुळं जास्त चर्चेत आहे. सैफनं ट्रेलर पाहिला नसला तरी सिनेमाची काही गाणी पाहिली आहेत. साराला ऑनस्क्रीन पाहणं थोडं मजेशीर आहे, असं सैफ सांगतो. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सैफनं साराच्या 'कुली नंबर १' सिनेमाविषयी सांगितलं की, 'एक वडील म्हणून आपल्या लेकीला पडद्यावर पाहताना मनात एक वेगळीच भावना निर्माण होते. ती स्वतःला सिद्ध करत आहे हे पाहून अभिमानही वाटतो. साराने मला ‘कुली नंबर १’ सिनेमातील काही गाणी दाखवली. ती काम खूप एन्जॉय करतेय याचा जास्त आनंद आहे'. वेगळा प्रयत्न 'करिश्मानं साकारलेली व्यक्तिरेखा साकारणं कठीण आहे. 'करिश्मा कपूरची जागा घेणं खूप कठीण आहे. ती एक आयकॉनिक स्टार आहे. करिश्मानं नव्वदचं दशक गाजवलं होतं. या चित्रपटात मी तिची जागा घेण्याचा प्रयत्न केलेला नाही. हा 'कुली नं. १' चित्रपटाचा रिमेक असल्यामुळं आमच्या दोघींची तुलना होणार. पण, या चित्रपटात काही तरी नवीन करण्याचा मी प्रयत्न केला आहे', असं सारा म्हणाली. तसंच ती पुढे म्हणाली की, 'इतक्या वर्षांमध्ये अनेक गोष्टी बदल्या आहेत. करिश्माला कॉपी करण्यापेक्षा चित्रपटात काही तरी वेगळं करण्याचा मी प्रयत्न केला आहे. मला वरुणसोबत काम केल्याचा आनंद आहे. जर मी करिश्माला कॉपी करण्याचा प्रयत्न केला असता तर माझी आणि वरुणची केमिस्ट्री एवढी उठून दिसली नसती.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lPS9Ts