Full Width(True/False)

तिसरी घंटा खणाणणार; प्रशांत दामले, कविता लाड यांनी केलं प्रेक्षकांचंं स्वागत

पुणे: तब्बल आठ महिन्यांनंतर मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा तिसरी घंटा खणाणणार आहे. ‘तुझी आम्री’ या मराठी प्रायोगिक नाटकानं नाट्यप्रयोगांचा श्रीगणेशा होत असून, त्यापाठोपाठ काही व्यावसायिक नाटकंही रंगभूमीवर दाखल होत आहेत. अभिनेते यांच्या '' या नाटकाचे प्रयोगही येत्या आठवड्यात पुण्यामध्ये होणार आहे. लॉकडाउन नंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग १२ डिसेंबरला पुण्यात यशवंतराव चव्हाण, बालगंधर्व आणि चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी प्रशांत दामले व अभिनेत्री यांनी स्वतः तिन्ही नाट्यगृहांमध्ये जाऊन काही काळ तिकीट विक्री केली आणि तयारीचा आढावा घेतला. इतकंच नाही तर अभिनेते प्रशांत दामले व किशोरी लाड यांनी स्वतः प्रेक्षकांचे स्वागत करत पहिल्या पाच रसिकांना तिकीटं दिली. वाचा: वाचा: अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि भक्ती देसाई यांच्या 'तू म्हणशील तसं' या मराठी व्यावसायिक नाटकाचा लॉकडाउननंतरचा मुंबईतील पहिला प्रयोग येत्या १२ डिसेंबरला कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात रंगणार आहे. तसंच 'दादा एक गुड न्यूज आहे', 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला', 'व्हॅक्युम क्लिनर' या नाटकांचे प्रयोगही मुंबई आणि पुण्यात लवकरच होणार असल्याचं कळतंय. ‘महानिर्वाण’ या गाजलेल्या नाटकाचा प्रयोग येत्या १३ डिसेंबरला पुण्यात ‘द बॉक्स’मध्ये होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3qv89hn