Full Width(True/False)

अन् सैफ अली खाननं 'रावणा'बद्दलचं ते वक्तव्य मागे घेतलं

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून ‘’ या आगामी चित्रपटाच्या चर्चा सुरू आहेत. 'बाहुबली' चित्रपटातून खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आलेला आणि सुपरस्टार बनलेला आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट रामायणावर आधारित असून या चित्रपटाबद्दल एक नवा वाद निर्माण झाला आहे.वादाला कारण झालं आहे ते म्हणजे सैफनं केलेलं एक वक्तव्य.टीका होत असल्याचं पाहून सैफनं त्याचं वक्तव्य मागं घेतल्याची माहिती आहे. वाचा: काय आहे वाद? चित्रपट रामायणावर आधारित असून सैफ रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं या चित्रपटात रावणाची बाजू दाखवण्यात येईल. रावणाबद्दल भूमिका मांडताना सैफनं अशी काही वक्तव्य केली की त्यामुळं त्याच्यावर टीका केली जात आहे. 'रावणाला आपण केवळ खलनायक म्हणूनच पाहात आलो आहोत. पण तो खरचं खलनायक होता की नाही. तो देखील एक माणूसच होता', असं सैफनं म्हटलं आहे. त्यामुळं त्याच्यावर अनेकांनी टीका केली आहे. वाचा: भाजप नेते राम कदम यांनी देखील सैफवर टीका केली आहे. 'रावणाला हिरो म्हणून दाखवण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही', असं त्यांनी म्हटलं आहे. ओम राऊत या चित्रपटाचं दिग्दर्शन करत असल्यानं चित्रपटाविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. 'आदिपुरुष' हा चित्रपट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वत: ओमनं ट्विट करत ही माहिती दिली होती. नुसार, ११ ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना अजून बराच वेळ या चित्रपटाची वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट थ्रीडी अॅक्शन ड्रामा प्रकारात मोडणारा असून, भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36NyoYz