Full Width(True/False)

ट्रेंड बदलतोय; मालिकांध्ये सासरे आणि सूनेची टिम ठरतेय हिट

संपदा जोशी कुठे सासूने रचलेल्या कट-कारस्थानांपासून बचाव करण्यासाठी सासरे मदत करतायत. तर कुठे स्वतःच्या मुलाविरोधात जाऊन सासरे सूनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतायत. सासरे आणि सून या नात्याविषयी फारसं बोललं जात नाही. पण, वडील आणि मुलगी यांच्यात जसं प्रेमळ, मायेचं नातं असतं अगदी तसंच नातं सध्या मालिकांमधल्या सासरे आणि सूनेच्या नात्यात बघायला मिळतंय. सुरूवातीपासून '' मालिकेत सिद्धीच्या पाठीशी तिचे सासरे म्हणजेच यशवंत खंबीरपणे उभे राहिलेले दिसले. सिद्धीची सासू तिच्या विरोधात असली तरी देखील तिला सासऱ्यांचा संपूर्ण पाठिंबा मिळतोय. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये गौरीच्या विरोधात अनेक कट-कारस्थानं रचली जात आहेत. पण, गौरीला मानसिक बळ तिचे लाडके दादासाहेब अर्थातच यशवंतराव शिर्केपाटील देतात. दुसरीकडे '' मालिकेत आप्पा आणि अरुंधती यांच्यातलं नातं अगदी वडील-लेकीसारखं आहे. सूनेला हक्क मिळवून देण्यासाठी आप्पा स्वत:चा मुलगा अनिरुद्धच्या विरोधात उभे आहेत. 'रंग माझा वेगळा'मध्ये दीपाची सासू सौंदर्या तिच्या विरोधात असली तरी सासरे तिच्या सोबत आहेत. 'फुलाला सुगंध मातीचा'मध्ये जिजी अक्का आणि शुभम यांच्यातला दुरावा कमी करण्यासाठी कीर्तीला तिचे सासरे मदत करताना दिसतायत. '' या मालिकेत राधिकालाही सौमित्राच्या बाबांचा म्हणजेच यशवंत बनहट्टींचा वेळोवेळी पाठिंबा मिळताना दिसतो. सौमित्रशी लग्न होण्याआधी गुरूनाथचे बाबा देखील राधिकाच्या सोबत होते, तर 'अग्गंबाई सासूबाई' मालिकेतील बबड्याला धडा शिकवण्यासाठी शेफ अभिजित राजे आणि शुभ्रा यांच्यातली भन्नाट केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. सध्याच्या मालिकांमध्ये पठडीबाहेरचा खलनायक दाखवला जातोय. आधीच्या बहुतांश मालिकांमध्ये सासू किंवा सासरे सूनेचा छळ करतायत, मग तो संघर्ष असं असायचं. पण, आता त्यांच्यातलं निर्मळ नातं दाखवलं जातंय, हे माझं निरीक्षण आहे. आजकालच्या मुली त्यांच्या पालकांशी जास्तीत जास्त संवाद साधण्याचा प्रयत्न करतात. तसाच संवाद त्या सासरी गेल्यावर त्यांच्या सासू-सासऱ्यांसोबतसुद्धा साधायचा प्रयत्न करतात. सासू आणि सूनेच्या नात्यातले अनेक पैलू आपल्याला दिसतात. पण, सासरे आणि सूनेचं नातं तसं फार फुलत नाही. कोणत्याही स्त्री-पुरुषाच्या नात्यात तो एक संकोच बघायला मिळतोच. पण, सासरे-सूनेचं नातं अधिकाधिक घट्ट व्हायला हवं, असं मला वाटतं. - सुखदा आयरे, लेखिका, अग्गंबाई सासूबाई सासरे-सून एक टीम हा ट्रेंड खूप चांगल्याप्रकारे दाखवला जातोय. सासरे आणि सूनेमध्ये घट्ट नातं असणं काळाची गरज आहे. विभक्त कुटुंबपद्धती असतानाही अशा प्रकाराचा ट्रेंड दाखवून जर खऱ्या आयुष्यातही असंच झालं तर सूनेलाही भक्कम आधार मिळेल. मालिकांमध्ये सुरू झालेला हा ट्रेंड खूप योग्य पद्धतीनं प्रेक्षकांसमोर येतो आहे, याचा आनंद आहे. - सुनिल गोडसे, सासऱ्यांची भूमिका, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका या समाजाचं प्रतिबिंब असतात. सासरे-सूनेमधील छान नातं बघायला मिळतं. यामागे एकच कारण असू शकतं, ते म्हणजे लेक आणि वडिलांचं नातं खास असतं. त्यामुळे सून ही सासऱ्यांमध्ये तिच्या वडिलांना बघत असते किंवा वडिलांसारखं नातं शोधत असते. सध्याच्या काळात काही सूना घर आणि नोकरी यामधील समतोल साधताना दिसतायत. याचं तिच्या सासरच्यांना कौतुकच असतं. आता जुनाट मानसिकता बदलत आहे. म्हणूनच हा ट्रेंड दिसतोय आणि तो चांगला आहे. - विदुला चौगुले, सूनेची भूमिका, जीव झाला येडापिसा


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mLcjyp