Full Width(True/False)

BSNLची जबरदस्त भेट, आता सर्व सर्कलमध्ये मिळणार १९९ रु, ७९८ रु, ९९९ रुपयांचा प्लान

नवी दिल्लीः गेल्या महिन्यात माहिती समोर आली होती की, बीएसएनएल पोस्टपेड सेगमेंटमध्ये तीन नवीन प्लान आणण्याची तयारी करीत आहे. १९९ रुपये, ७९८ रुपये, ९९९ रुपयांच्या या तीन प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्लानला रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी लाँच केले होते. जिओच्या पोस्टपेड प्लानची सुरुवात सुद्धा ३९९ रुपयांपासून सुरू होते. परंतु, बेसिक प्लान १९९ रुपयांचा आहे. बीएसएनएलने या प्लानला सर्व टेलिकॉम सर्कलमध्ये उपलब्ध केले आहे. वाचाः बीएसएनएलच्या पोस्टपेड प्लानची सुरुवात १९९ रुपयांपासून १९९ रुपयांचा प्लान सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलचा सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान आहे. कारण, कंपनीने ९९ रुपयांचा प्लान आता हटवला आहे. १९९ रुपयांच्या प्लानमध्ये बीएसएनएल नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग तर दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी ३०० मिनिट्स मिळतो. या प्लानध्ये २५ जीबी डेटा ऑफर केला जातो. तसेच यासोबतच ७५ जीबी रोलओव्हरची सुविधा उपलब्ध आहे. डेटा लिमिट संपल्यानंतर युजर्संना १०.२४ जीबी प्रति या प्रमाणे पैसे द्यावे लागतील. याशिवाय १०० एसएमएस सुद्धा प्रत्येक प्लानमध्ये ऑफर केले जातात. वाचाः ७९८ रुपयांचा पोस्टपेड प्लानमध्ये बीएसएनएचा हा प्लान अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सोबत येते. म्हणजेच देशात कोणत्याही नेटवर्कवर व्हाइस कॉलिंग फ्री मिळते. या रिचार्ज पॅकमध्ये ५० जीबी डेटा मिळतो. तर रोलओवर फॅसिलिटी १५० जीबी पर्यंत आहे. ग्राहकांना रोज १०० एसएमएस फ्री पाठवता येवू शकते. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये दोन फॅमिली कनेक्शन ऑफर केले जाते. फॅमिली कनेक्शनमध्ये कंपनी अनलिमिटेड व्हाइस सुविधा, ५० जीबी डेटा आणि १०० एसएमएस रोज दिले जाते. वाचाः ९९९ रुपयांच्या पोस्टपेड प्लानच्या या पॅकमध्ये प्रत्येक नेटवर्कवर अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग मिळते. या रिचार्ज पॅकमध्ये ७५ जीबी डेटा मिळतो. जे २२५ जीबी पर्यंत रोलओवरची सुविधा आणि १०० एसएमएस प्रत्येक दिवसांची सुविधा सोबत येते. टेलिकॉम कंपनी अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग सुविधा मिळते. प्रत्येक फॅमिली कनेक्शनला ७५ जीबी डेटा व १०० एसएमएस रोज ऑफर करते. वाचाः बीएसएनएल आपल्या तिन्ही नवीन पोस्टपेड प्लानसोबत डेटा रोलओव्हर फॅसिलिटी देत आहे. याशिवाय अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग (२५० मिनिट रोज) मिळते. ९९ रुपये, २२५ रुपये, ३२५ रुपये, ७९९ रुपये आणि ११२५ रुपयांच्या प्लानचा वापर करीत असलेले युजर्स कंपनीकडून नवीन माहिती देण्यापर्यंत या प्लान्सचा वापर करीत आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qg0Gm5