Full Width(True/False)

Oppo Reno 5 5G सीरीज १० डिसेंबर रोजी होणार लाँच, जाणून घ्या काय आहे खास

नवी दिल्लीः Oppo सीरीजची खूप दिवसांपासून उत्सूकता लागली आहे. एका विबो पोस्टमध्ये या सीरीजच्या लाँचिंग तारीख १० डिसेंबर रोजी सांगितले आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी तीन स्मार्टफोन रेनो 5, रेनो 5 प्रो आणि रेनो5 प्रो+ लाँच करू शकते. विबोवर दिसत असलेल्या रेनो ५ ची रियर डिझाइनचा फोटो लीक झाला असून याची इंटरनेटवर खूप चर्चा सुरू आहे. फोनच्या रियरमध्ये तुम्हाला ग्रेडियंट कलर डिझाइन पाहायला मिळू शकते. वरच्या बाजुला क्वॉड कॅमेर सेटअप दिला आहे. वाचाः फोनच्या बॅक पॅनेलवर 'Reno Glow'ची बेजिंग दिली आहे. एकूण हा फोन नवीन लूक जुन्या व्हर्जन शी बराच मिळता जुळता आहे. यावर्षीच्या सुरुवातीला कंपनीने Reno4 5G सीरीजला चीनमध्ये लाँच केले होते. ही सीरीज जबरदस्त डायमंड कट डिझाइन सोबत येते. विबो पोस्टच्या माहितीनुसार, रेनो ५ ५जी सीरीज याच डिझाइन सोबत एन्ट्री करीत आहे. वाचाः मिळू शकते खास वैशिष्ट्ये रेनो ५ ५जी सीरीजमध्ये पंचहोल डिझाईन सोबत 90Hz रिफ्रेश रेटचा OLED पॅनेल मिळू शकतो. रेनोच्या या सीरीजमध्ये ६.४३ इंचाचा फ्लॅट डिस्प्ले मिळू शकतो. तर रेनो5 प्रो 5G आणि प्रो+ 5G मध्ये कंपनी 6.55 इंचाच डिस्प्ले मिळू शकतो. या सीरीजमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड ColorOS 11 मिळू शकतो. वाचाः प्रोसेसरमध्ये रेनो 5 में स्नॅपड्रॅगन 765G, रेनो5 प्रो मध्ये Dimensity 1000+ आणि रेनो5 प्रो+ मध्ये स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट मिळू शकते. रेनो ५ मध्ये बॅटरी 4300mAh मिळू शकते. रेनो 5 प्रो मध्ये 4350mAh आणि रेनो5 प्रो+ मध्ये 4500mAh बॅटरी मिळू शकते. सेल्फीसाठी या सीरीजच्या तिन्ही स्मार्टफोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. वाचाः रेनो ५ आणि रेनो ५ प्रो मध्ये कंपनी ६४ मेगापिक्सलचे प्रायमरी लेन्सचे क्वॉड कॅमेरा ऑफर करू शकते. यात प्रायमरी कॅमेरा शिवाय एक ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल लेन्स, २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स मिळू शकतो. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33ApRGh