Full Width(True/False)

रंगोलीला कंगना रणौतने दिला एक पपी गिफ्ट, दिलं अनोखं नावं

मुंबई- आज कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेलचा आज (२ डिसेंबर) वाढदिवस आहे. या खास प्रसंगी रंगोलीची बहीण कंगना रणौतने तिला एक खास भेट दिली आहे. तसेच, सोशल मीडियावरही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे रंगोलीने कंगनाच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत एक मजेशीर 'थँक्यू पोस्ट'ही लिहिली आहे. कंगनाने पोस्ट केले क्यूट फोटो कंगनाने लिहिले की, माझ्या एकुलत्या एक बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रंगोली नेहमीच आनंदी आणि हसतमुख दिसते पण मला माहीत आहे की कुठेतरी ती एक आईही आहे. तिच्या घरात आज नवीन सदस्याचं आगमन झालं आहे. मित्रांनो गप्पू चंडेलला भेटा. रंगोलीला ही भेट खूप आधीपासूनच होती रंगोलीने कंगनाच्या पोस्टला उत्तर देत ऊन उत्तर दिले आहे, मला नेहमीच एक कुत्रा हवा होता. तोही तुझ्याकडूनच हवा होता. कारण माझ्या आयुष्यात अनेक चांगल्या गोष्टी तुझ्याकडूनच मिळाल्या आहेत. अखेर तुला मी देत असलेला इशारा कळला याचा मला आनंद आहे. वाढदिवसाला उत्तम भेट दिल्याबद्दल धन्यवाद. रंगोली आणि कंगना शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहेत भाई अक्षतच्या लग्नानंतर रंगोली आणि कंगनाने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. दोघीही सध्या हैदराबादमध्ये आहेत. कंगना 'थलायवी' सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. अलीकडेच तिने संजय दत्तसोबतचा एक फोटो शेअर केला होता. फोटोला कॅप्शन देताना कंगना रणौतने लिहिले की, 'जेव्हा मी आणि संजू सरांना एकाच हॉटेलमध्ये थांबल्याचं कळलं तेव्हा त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेले. तो आधीपेक्षाही जास्त हँडसम आणि फिट दिसत आहे.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Jst43Z