Full Width(True/False)

Video: भारती सिंग- हर्ष पोहोचले आदित्य नारायणच्या रिसेप्शनला

मुंबई- कॉमेडी क्वीन आणि तिचा नवरा अलीकडेच आणि श्वेता अग्रवाल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला पोहोचले. योगायोगाने आज (गुरुवारी) त्यांच्या लग्नाचा वाढदिवसही आहे. यावेळी भारतीने पांढऱ्या रंगाचा गाउन घातला होता तर हर्षने निळ्या रंगाचं ब्लेझर घातलं होतं. या रिसेप्शनमध्ये दोघंही फार आनंदी दिसत होते. संपूर्ण रिसेप्शन पार्टीत हर्ष आणि भारती यांना त्यांच्या चाहत्यांनी घेरलं होतं. दोघंही पार्टीतील पाहुण्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ काढताना दिसले. दरम्यान, कंगना आणि हर्ष दोघांचीही अजून चौकशी संपलेली नाही. त्यांची काही दिवसांसाठी जामिनावर सुटका करण्यात आली आहे. भारतीच्या घरातून सुमारे ८६.५ ग्रॅम गांजा सापडला होता. त्यानंतर भारती आणि हर्षला तातडीने अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. दोघांना काही दिवस तुरुंगात रहावं लागलं होतं. यानंतर दोघांनाही जामीन मिळाला. त्यांना जामीन मिळवून देण्यात एनसीबीच्या दोन अधिकाऱ्यांनी मदत केल्याचं समोर आळं. यानंतर त्या दोन्ही अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात आलं. आदित्य आणि श्वेताने १ डिसेंबर रोजी मंदिरात लग्न केलं. यानंतर २ डिसेंबरला त्यांनी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवलं होतं. आदित्य नारायणच्या लग्नाच्या रिसेप्शनला बॉलिवूड आणि टीव्ही स्टार्सनी आवर्जुन हजेरी लावली होती. गोविंदासह अनेक स्टार्स यावेळी एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलताना दिसले. सध्या रिसेप्शन पार्टीमधील उदित आणि आदित्य नारायण या बाप-लेकांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Vx5fuo