Full Width(True/False)

अनुष्का- विराटसाठी लकी आहे ११ नंबर, या नंबरने बदलं आयुष्य

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हे ११ जानेवारी रोजी आई- बाबा झाले. अनुष्काने ब्रिच कॅण्डी इस्पितळात मुलीला जन्म दिला. स्वतः विराटने सोशल मीडियावर ही बातमी सर्वांसोबत शेअर केली. फार कमी लोकांना माहीत आहे की अनुष्का आणि विराटसाठी ११ ही तारीख फारच खास आहे. या तारखेने दोघांना एकच नाही तर दोन आनंदाचे क्षण दिले आहेत. ११ डिसेंबर २०१७ रोजी होतं अनुष्का- विराटचं लग्न ११ डिसेंबर २०१७ रोजी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी इटलीमध्ये लग्न केलं. या जोडप्याच्या लग्नाला फक्त जवळच्या व्यक्तींनाच आमंत्रण देण्यात आलं होतं. दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता ११ जानेवारी २०२१ रोजी मुलीच्या रुपात त्यांच्या घरी लक्ष्मी आली आहे. म्हणूनच या सुपरहिट जोडप्यासाठी ११ तारीख ही फारच चांगली आहे. सोशल मीडियावर दिली आनंदवार्ता दरम्यान, काल ११ जानेवारी रोजी विराटने त्याच्या सोशल मीडियावर ही आनंदवार्ता देताना म्हटलं की, ' हे सांगून आम्हाला आनंद होत आहे की आज दुपारी आम्हाला मुलगी झाली. आम्ही तुमच्या प्रेमाबद्दल आणि शुभेच्छाबद्दल मनःपूर्वक आभारी आहोत.अनुष्का आणि आमची मुलगी दोघीही ठीक आहेत.' विराटने पुढे लिहिले की, 'अनुष्का आणि आमची मुलगी दोघींची तब्येत ठीक आहे. आमच्या आयुष्याचा हा नवा अध्याय आहे. आता आम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवण्याची किती गरज आहे याची तुम्हाला चांगली कल्पना असेल. त्यामुळे आता थोडी प्रायव्हसी द्या अशी विनंती आम्ही करतो.' अनुष्काने प्रेग्नसीमध्ये केलं फोटोशूट अनुष्का शर्माने एका मॅगझिनसाठी प्रेग्नसी फोटोशूट केलं होतं. तिच्या या फोटोंनी बी-टाउनमध्ये खळबळ उडाली होती. या फोटोशूटमध्ये तिने बेबी बंप फ्लॉन्ट केला होता. हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिले की, 'हे फोटो तिने स्वतःसाठी आणि तिच्या संपूर्ण आयुष्यासाठी घेतले आहेत.' दरम्यान, लॉलॉकडाऊनमध्ये अनुष्का आणि विराटने ते लवकरच आई- बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली होती. विराट कोहलीने एका पोस्टद्वारे जानेवारी २०२१ मध्ये अनुष्का आई होणार असल्याचं सांगितलं होतं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39nGyH5