Full Width(True/False)

सर्वकाही विसरून मित्रांसोबत रियाची पार्टी; फोटो पाहून सुशांतचे चाहते संतापले

मुंबई: याच्या निधनानंतर चर्चेत आलेली त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री हिचे नुकतेच एका पार्टीमधील फोटो समोर आल्यानं सुशांतच्या चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर रियावर त्याच्या आत्महत्येस कारणीभूस असल्याचे अनक आरोप करण्यात आले. सुशांतच्या कुटुंबियांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत सीबीआय चौकशीची मागणी केली. सीबीआयकडून प्रकरणाचा तपास होत असताना यात ड्रग्ज अँगल समोर आला आणि रिया या सगळ्यात अधिक अडकत गेली. नारकोटिक्स कन्ट्रोल ब्यूरोने () रियाला ड्रग्ज अँगल प्रकरणात अटक केली. जवळपास एक महिना तुरूंगात घालवल्यानंतर रियाला जामिनावर सोडण्यात आलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही रिया कुठंही दिसली नव्हती. आता मात्र तिचे पार्टीचे फोटो समोर आले आहेत. रोडीज या रिअॅलिटी शोमुळं प्रसिद्धीच्या झोकात आलेला यानं रियासोबत काही फोटो शेअर केले आहेत. राजीवनं नुकतंच एका पार्टीचं आयोजन केलं होतं. रिया देखील या पार्टीत सहभागी झाली होती. राजीवनं या पार्टीतील एक फोटो शेअर केलाय. त्या फोटोमध्ये मध्ये रिया राजीवला मिठी मारताना दिसतेय. विशेष म्हणजे या फोटोला राजीवनं , ‘माय गर्ल’ असं कॅप्शन दिल्यानं सुशांतच्या चाहत्यांनी दोघांनाही ट्रोल केलं आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Lxh7uF