मुंबई- अभिनेत्री ही व्हॅक्सीन घेणारी पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. लसीकरणानंतर तिने आपला पहिला फोटो चाहत्यांसोबत शेअर केला. यासोबतच तिने नवीन वर्षाचं सकारात्मकतेने स्वागत केलं आहे. सध्या त्याचे चित्र सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिल्पाने दाखवला व्हॅक्सीन नंतरचा फोटो संपूर्ण जगाने २०२० हे वर्ष करोनाच्या दहशतीत घालवलं. आता लोक या लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरु देखील झाली. शिल्पाने दुबईतून ही पोस्ट शेअर केली. या फोटोत तिच्या हातावर मेडिकल टेप आणि कापूस लावलेला दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना तिने लिहिले की, सुरक्षित लसीकरण, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज... थँक्यू यूएई. चाहते म्हणाले, आम्हाला अपडेट देत रहा या फोटोत शिल्पाने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टवर कमेन्ट केली असून तिचं भरभरून कौतुकही केलं आहे. एका चाहत्याने त्याच्या पोस्टवर कमेन्ट करत लिहिले की, तुम्हाला लस मिळाली? आम्हाला त्याचे अपडेट देत रहा. शिल्पाने वर्ष २००० मध्ये यूकेस्थित बँकर अपरेश रंजीतशी लग्न केलं. यानंतर ती कुटुंबासोबत दुबईत राहत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Xo0OmC