मुंबई- ': चॅप्टर २' हा यंदाच्या वर्षी प्रदर्शित होणारा असा एक सिनेमा आहे, ज्याच्याकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. सिनेमातील मुख्य कलाकार आणि संजय दत्तने त्यांच्या या सिनेमाच्या टीझरची लिंक शेअर केली आहे. यशच्या वाढदिवसाला म्हणजे आज ८ जानेवारीला टीझर रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. पण काहींनी टीझर एक दिवस आधीच प्रदर्शित केला. त्यामुळे निर्मात्यांनीही एक दिवस आधी ७ जानेवारीला टीझर प्रदर्शित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यशने चाहत्यांना दिला खास मेसेज नवीन पोस्टरद्वारे संजय दत्तने टीझर शेअर केला आहे. त्याचवेळी यशने एका व्हिडिओमध्ये चाहत्यांना खास मेसेज देत म्हटलं की, 'काही महान व्यक्तींनी टीझर लीक केला होता. असं करण्यामागचं त्यांचं कारण काय होतं माहीत नाही. पण या गोष्टींचा मला जराही त्रास झालेला नाही. मी त्यांना शुभेच्छा देतो.' श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन यांच्या महत्वपूर्ण भूमिका यावेळी यशने चाहत्यांकडे दिलगिरी व्यक्त केली. संपूर्ण सिनेमाच्या टीमचं टीझर प्रदर्शित करण्याचा एक प्लॅन फ्लॉप केला. 'केजीएफ: चॅप्टर २' सिनेमा यावर्षी उन्हाळ्यात प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांची योजना आहे. सिनेमात श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2LAGOdx