Full Width(True/False)

‘कागझ’ चित्रपटात सलमानच्या चाहत्यांना मिळणार 'हे' खास सरप्राइज

मुंबई:आगामी ‘’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून चित्रपट आज प्रदर्शित झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी सलमान खानने या चित्रपटासाठी एक कविता वाचली असल्याची माहिती या चित्रपटाविषयी बोलताना दिली. कौशिक म्हणाले की, 'तरुण कवी अझीम अहमद अब्बासी यांनी लिहिलेल्या कवितेला आम्ही चित्रपटात वापरले आहे. या संपूर्ण चित्रपटाचा आशय या कवितेत एकवटला असून आपल्या खास अंदाजात यानं ती वाचली आहे. चित्रपटात सुरूवातीला आणि शेवटी येणाऱ्या या कवितेला सलमान खान याच्या आवाजानं एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे कौशिक म्हणाले.' ‘कागझ’ सलमान खान फिल्म्स आणि सतीश कौशिक प्रोडक्शन्स यांची निर्मिती असून दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले आहे. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, मोनल गज्जर आणि अमर उपाध्याय यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3opelpB