नवी दिल्लीः दक्षिण कोरियाची टेक कंपनी सॅमसंगने भारतात आपला बजेट स्मार्टफोन सॅमसंग लाँच केला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ८ हजार ९९९ रुपये आहे. सॅमसंगच्या म्हणण्यानुसार, सॅमसंग गॅलेक्सीचा हा पहिला ४ जी स्मार्टफोन आहे. ज्याची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. वाचाः Galaxy M02s स्मार्टफोनला दोन व्हेरियंट्समध्ये लाँच करण्यात आले आहे. बेस व्हेरियंट मध्ये ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज दिला आहे. तर टॉप मॉडलमध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबी इंटरनल स्टोरेज दिले आहे. ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ८ हजार रुपये तर ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. या फोनला ब्लॅक, ब्लू, आणि रेड कलर व्हेरियंट्स मध्ये खरेदी करता येवू शकते. ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून या फोनला खरेदी करता येवू शकते. वाचाः Galaxy M02s मध्ये ६.५ इंचाचा एचडी प्लस Infinity V डिस्प्ले दिला आहे. स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 450 प्रोसेसर दिला आहे. हा स्मार्टफोन Android 10 बेस्ड OneUI दिला आहे. Galaxy M02s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सलचा दिला आहे. दुसरा कॅमेरा २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स तर २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. लॉकसाठी पिन आणि पॅटर्न किंवा फेस लॉक फीचर दिले आहे. वाचाः Galaxy M02s मध्ये पॉवर देण्यासाठी 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. तसेच १५ वॉटचे फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. कनेक्टिविटी साठी स्मार्टफोन मध्ये 4G, USB Type C, Bluetooth, GPS सहित 3.5mm हेडफोन जॅक दिला आहे. सॅमसंगने पहिल्यांदा कमी किंमतीत तीन रियर कॅमेरे आणि 5000mAh बॅटरी आणि 4GB रॅमचा फोन दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39bwW26